राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यपदासाठी तुपे यांच्या नावाला पक्ष नेतृत्त्वाने पसंती दिल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडीमुळे शहराध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, विरोधीपक्षनेतेपदही तुपे यांच्याकडेच राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून, या पदाची पताका महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यपदासाठी तुपे यांच्या नावाला पक्ष नेतृत्त्वाने पसंती दिल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडीमुळे शहराध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, विरोधीपक्षनेतेपदही तुपे यांच्याकडेच राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

विद्यमान शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शहराध्यक्ष बदलाची चर्चा पक्ष संघटनेत सुरू होती. त्यासाठी पक्षातील 13 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी नगरसेवक दीपक मानकर, सुभाष जगताप, प्रशांत जगताप यांची नावे चर्चेत होती. मात्र, मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. तर, सुभाष जगताप यांना मोहोळमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा असल्याने या पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकला नाही. या पाश्‍वभूमीवर शहराधयक्षपदाच्या शर्यतीत तुपे यांचे नाव अचानक पुढे आले. त्यावर एकमत झाल्याने तुपेंचे नाव आघाडीवर राहिले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत तुपे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा शहराध्यक्ष कोण ? हा बहुचर्चित प्रश्‍न सुटला आहे. 

Web Title: Chetan Tupe selected NCP pune president