
संभाजी महाराज समाधिस्थळ होणार जागतिक दर्जाचे
कोरेगाव भीमा - श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) समाधीस्थळ (Cemetery) हे राष्ट्रीय स्मारक (National Monument) असून महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government)) माध्यमातून तब्बल ३०० कोटींच्या विकास आराखड्यास (Development Plan) मंजुरी मिळाल्याने लवकरच वढू येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला.
आज खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार अॅड अशोक पवार, माजी सभापती सुजाता पवार, सविता बगाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, बँकेचे माजी संचालक वर्षा शिवले, सरपंच सारीका शिवले, सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, सदस्य कृष्णा आरगडे, अनिल भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे, राहुल कुंभार, अंजली शिवले, रेखा शिवले, रोहिणी भंडारे, रमाकांत शिवले, संतोष शिवले, नवनाथ गुंडाळ, सचिन भंडारे, संजय शिवले, शंकर भाकरे, जयसिंग भंडारे, आदी उपस्थित होते.
शंभुराजांच्या समाधिस्थळी पूजेनंतर शंभूराजांच्या पुणार्कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सारीका शिवले, सदस्या अंजली शिवले यांच्या हस्ते सुळे यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गोविंद गोपाळ यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘शंभूराजांच्या समाधीमुळे मोठे महत्त्व असलेल्या वढू परिसराचा विकास व येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने ३०० कोटीचा निधी दिल्याने या ठिकाणी जागतिक दर्जाचे शक्तिस्थळ निर्माण होईल.’’
बैलगाडीतून मिरवणूक
या वेळी सुळे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी माजी सभापती सुजाता पवार यांनी पुढाकार घेतला.
केंद्राकडून राज्यांना मदत आवश्यक : सुळे
महागाईमुळे महाराष्ट्रासह देशभरातील अर्थकारण अडचणीत आले असून, अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले असल्याने अशा वेळी आवश्यक बाबींसाठी केंद्राने राज्यांना मदत करणे गरजेचे आहे.
Web Title: Chhatrapati Sambhaji Maharaj Cemetery Will Be World Class Supriya Sule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..