बारामती जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न - आमदार माधुरी मिसाळ

बारामती जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न - आमदार माधुरी मिसाळ

गराडे - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यात काही तालुक्‍यांत पवारविरोधी वातावरण आहे. मागील वेळी महादेव जानकर यांच्या माध्यमातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण, या वेळी मात्र आपली सत्ता आहे. याचा फायदा घेत येणाऱ्या सर्वच निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. हा मतदारसंघ जिंकण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ते आपल्याला पूर्ण करावयाचे आहे,’’ असे आवाहन भाजपच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी व पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात भाजपच्या भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर या चार तालुक्‍यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी मिसाळ बोलत होत्या. या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक शिवाजीराव भुजबळ, प्रदेश संघटक रवी अनासपुरे, सचिन सदावर्ते, दिलीप खैरे, संगीताराजे निंबाळकर, वासुदेव काळे, तात्या कामठे, पंडित मोडक, धीरज भटकळ, गिरीश जगताप, आर. एन. जगताप, सचिन लंबाते, साकेत जगताप, आनंद जगताप, नदीम इनामदार, कैलास जगताप आदी उपस्थित होते.

शिवाजीराव भुजबळ म्हणाले, ‘‘प्रत्येक तालुक्‍यात असणाऱ्या पक्षाच्या संघटनांच्या माध्यमातून आपल्याला पक्षाशी बांधिलकी मानणाऱ्या लोकांना एकत्र करावयाचे आहे. या लोकांनी गावातील बूथपर्यंत आपला विस्तार व आपल्या पक्षाचा विचार पोचविला पाहिजे. ज्या लोकांना विविध शासकीय माध्यमातून मदत केली आहे, अशा सर्वांच्या संपर्कात आपल्याला राहावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधील आपला उमेदवार हा विजयी झालाच पाहिजे असे.’’

‘एकविसाव्या शतकात आपले नेते मोदीसाहेब आहेत. प्रत्येकाने नवीन मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत,’’ असे रवी अनासपुरे यांनी सांगितले. बैठकीचे आयोजन सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप यांनी केले. बाळासाहेब गरुड यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कामठे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com