...तर मुख्यमंत्री महापूजेला गेले असते - दिग्विजय सिंह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे - ‘‘महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती, तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला गेले असते,’’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.

पुणे - ‘‘महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती, तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला गेले असते,’’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.

येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लता राजगुरू उपस्थित होते. सिंह म्हणाले, ‘‘मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केलेल्या आंदोलना वेळी त्यांनी भूलथापा मारल्या. एका महिन्यात तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तयार सुरू झाली आहे. याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे निमित्त करून ते पंढरपुरात महापूजेला आले नाहीत, त्यांच्या मनात श्रद्धा असती तर ते नक्की आले असते.’’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी मिठी मारून हस्तांदोलन करणे, एका खासदाराला हास्य करीत डोळा मारणे या विषयाला विनाकारण जास्त प्रसिद्धी दिली गेली. परंतु, राहुल गांधींच्या भाषणातील मुद्‌द्‌यांना पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. शिवसेना मतदानाच्या दिवशी तटस्थ राहिली म्हणजे त्यांनीही मोदींना साथ दिली नाही. सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून जात आहेत,’’ अशी टीकाही सिंह यांनी केली. 

Web Title: Chief Minister would have gone to Mahapooja says Digvijaya Singh