मुख्यमंत्र्यांची तोफ बारामतीतही धडाडणार

मिलिंद संगई
सोमवार, 29 जुलै 2019

बारामती शहर : मुख्यमंत्र्यांच्या पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या महाजनादेश यात्रेमध्ये बारामतीचाही समावेश करण्यात आला आहे. 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत जाहीर सभा घेणार असून त्या दिवशी रात्री बारामतीतच मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बारामतीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 

'अब की बार 220 पार' या सूत्राला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचे आयोजन केलेले आहे. दोन टप्प्यात ही जनादेश यात्रा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बारामतीचा समावेश त्यांच्या दौऱ्यात करण्यात आला आहे. बारामतीतील रेल्वे ग्राऊंडवर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान बारामतीतील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री रात्रभर मुक्काम करणार असून दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहतील. बारामतीतील सभा व पत्रकार परिषदेचा संदेश अधिक प्रभावीपणे राज्य व देशात जाईल, असा भाजपचा कयास असून त्या दृष्टीने आतापासूनच मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन भाजप संघटनेकडून सुरु झाले आहे. 

भाजपमध्ये राष्ट्रवादीसह अनेक पक्षातून सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बारामतीत नेमके काय बोलणार या बाबत आता उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत अनेक मंत्रीही बारामतीत आवर्जून हजेरी लावणार असून बारामतीत भाजपने शक्तीप्रदर्शनाची तयारी आतापासूनच सुरु केल्याचेही समजते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's will visit Baramati during the Mahajandesh Yatra