आळंदीतील संस्कार ग्रुप ऑफ फायनान्सच्या म्होरक्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली.

आळंदी (पुणे) : ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली.

कुंभार पतीपत्नीने गेली काही वर्षांपासून संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनी स्थापन करून पुणे परिसरातील महिला बचत गट आणि अन्य ठेविदारांना जादा दराच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा टाकला. हजारो महिला आणि गुंतवणूकदार कुंभार पतिपत्निंच्या पलायनाने हवालदिल झाले होते. स्थानिक पुढारीही अशा कठिण प्रसंगी गुंतवणूकदारांच्या मागे उभे राहिले नव्हते. सतत दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत कुंभार पतीपत्नि फरारी झाले होते.

जानेवारी 2017मध्ये एमपीआयडी कायद्यानुसार संस्कार ग्रुप ऑफ फायनान्सच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून वैकुंठ कुंभार,राणी कुंभार,फरार होते.यापर्वी त्यांनी उच्च न्यायालयात अटकपू्र्व जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर ठेवीदारांनी आंदोलन,उपोषणाचा मार्ग पत्करला.मात्र तरिही गुंतवणूकदाराना दाद न देता कुंभार पतीपत्नि सतत शहर बदलून राहत असल्याची चर्चा रंगायची. 

दरम्यान, यापूर्वी कुंभारची मेव्हणी कमल शेळके हीला दिघी पोलिसांनी 21 सप्टेंबर 2018 ला अटक करून सत्र न्यायालयात हजर केले. शेळके सध्या तुरूंगात आहे.  संस्कारच्या राज्यातील तसेच परराज्यातील मालमत्तांचा शोघ घेतला जात आहे. अजय लेले,शिवाजी ढमढऱे या दोन संचालकांना यापूर्वीच अटक केली.तर रात्री कुंभार पतीपत्निला रात्री इंदौर येथून अटक केल्याची माहिती पुढे आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chief of sanskar group of finance arrested by police at Alandi Pune