चिखली ‘आरटीओ’त दलालराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

चिखली - परिवहन कार्यालयाच्या परिसरात दलालांना मज्जाव करावा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड कार्यालच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातील दलाल हटविण्यात आलेले नाहीत. उलट आधिकाऱ्यांबरोबर कार्यालयीन कागदपत्रेही ते हाताळत आहेत. विशेष म्हणजे हे दलाल वाहन परवाना देताना अर्जदार आणि आधिकाऱ्यांमध्ये ‘आर्थिक दुवा’ म्हणून दलाल भूमिका बजावत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबावी, यासाठी आरटीओ कार्यालयाच्या परिसरात दलालांना येण्यास मज्जाव करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात आजही आधिकाऱ्यांबरोबर दलाल काम करताना दिसत आहेत. मोशीतील ट्रॉफिक पार्कमधील सध्या वाहन परवाना दिला जातो. या वेळी चाचणी देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रथम तेथे असलेल्या दलाला भेटावे लागते. तोच चाचणी देणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र हाताळून तपासतो. तसेच नोंदवहीत त्याची नोंद करतो. त्यानंतर त्याच्याकडून काही कागदपत्रावरच विशिष्ट प्रकारचा कोडवर्ड (खून) लिहला जातो. विशेष म्हणजे दररोज हा कोडवर्ड बदलत असतो. तो कोडवर्ड टाकलेली व्यक्तीच चाचणीत पास होते असल्याचे चाचणी देण्यासाठी आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले.

परिवहन कार्यालयात अनेक कामे ऑनलाइन पद्धतीने चालत असून, दलालांना कार्यालयात थारा दिला जात नाही. नागरिक त्यांची कामे स्वतः करीत असतात. आता १६ सेवांचे शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरले जाणार आहेत. त्याचे प्रशिक्षणही दिले आहे.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

वाहनपरवाना चाचणी देण्यासाठी गेले असताना तेथील व्यक्तीने पैसे दिले तरच पास केले जाते. अन्यथा एखाद्या दलालामार्फत किंवा ड्रायव्हिंग स्कूल चालकामार्फत येऊन वाहनपरवाना काढावा लागेल, असे तेथे कागदपत्र तपासणाऱ्या व्यक्तीने सांगितले. परंतु तीन चार वर्षांपासून दुचाकी चालवत असल्याने नापास होणार नाही, असा विश्‍वास मला होता. परंतु चाचणी दिल्यावर उलट्या दिशेने वाहन चालविल्याचे कारण देऊन त्यांनी नापास केले.
- श्रद्धा दुधाळ, नागरिक

पैसे न देता स्वतःच्या जबाबदारीवर वाहन परवाना काढण्यासाठी गेलो. परंतु दोन्ही वेळी नापास झालो. आता दलालामार्फत जाण्याशिवाय पर्याय नाही. 
- सुदेश लोखंडे, नागरिक

Web Title: chikhali pune news agent in rto