"शाळांमधून उभे राहणार रामनदी पुनरूज्जीवनाचे बालकार्यकर्ते"

रामनदी पुनरूज्जीवन कार्याच्या शाळा अभियानास बाणेर येथील संत तुकाराम विद्यालयात प्रारंभ
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलsakal

बालेवाडी : पुण्यातील केवळ मुळा-मुठाच नव्हे तर रामनदी देखील नव्याने बनविण्यात आलेल्या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आली असून प्राधिकरणासाठी सुमारे सतराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आता केवळ पाठपुरावा करुन निधी मिळवणे आणि नद्यांच्या पुनरूज्जीवना्च्या कार्यास गती देणे एवढे कार्य बाकी आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या ह्या क्रांतीकारी प्रकल्पामध्ये रामनदी पुनरूज्जीवनाचा सिंहाचा वाटा असणार आहे, असे मत भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील
इंग्रजांच्या शिक्षणातून गुलामीची मानसिकता

किर्लोस्कर वसुंधरा अंतर्गत सुरु असलेल्या रामनदी पुनरूज्जीवन कार्याच्या शाळा अभियानास बाणेर येथील संत तुकाराम विद्यालयात प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किर्लोस्कर न्युमॅटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश मिजार, पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक वृंद, कर्मचारी, स्थानिक नगरसेवक, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शैलजा देशपांडे, वैशीला पाटकर, विनोद बोधनकर, नयनीश देशपांडे आणि सुवर्णा भांबूरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

पाटील यावेळी म्हणाले, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम एकट्या दुकट्याचे नसून त्यासाठी महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे पाठबळ मिळाल्यास चळवळीला गती मिळेल . सध्या प्लॅस्टिक ही देखील मोठी समस्या असून प्लॅस्टिक पासून डिझेल बनवता येते. असे छोटे छोटे प्रकल्प गृहनिर्माण सोसायट्यांच्या पातळीवर तसेच शाळा पातळीवर बसविण्याची गरज आहे. यासाठी माझ्या आमदार निधीतून मी निधी उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. असे ही ते म्हणाले.

पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या , शिक्षक-विद्यार्थी आणि पालक अशी साखळी तयार करुन हे कार्य तडीस न्यावे लागेल. नद्यांच्या आणि मनुष्यजातीच्या इतिहासाचा आढावा घेतला असता मनुष्य संस्कृती ही नद्यांच्या काठी वसली आणि वाढल्याचे दिसून येते. नद्या लयाला गेल्याने अनेक मानव संस्कृती लयास गेल्याचे दाखले मानवप्राण्याच्या इतिहासात दिसून येतात.येणा-या पिढीचे आणि पर्यायाने संपूर्ण मनुष्य जातीच रक्षण आणि संवर्धन करावयाचे झाल्यास आपल्याला नद्यांचे आरोग्य हे जपता आले पाहिजे.

चंद्रकांत पाटील
चार वर्ष वयाच्या बेवारस बालिकेचे आढळले पार्थिव

किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी म्हणाले, या अभियानाच्या वतीने वेगवेगळी व्यासपीठे तयार केली जात आहेत. यामध्ये रामनदी काठी असलेल्या 100 सोसायटी,55 महाविद्यालय,25 शाळाचा समावेश करण्यात आला आहे.

किर्लोस्कर न्यूमॅटिक्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश मिजार म्हणाले, अनेक दशकांपूर्वी शंतनुराव किर्लोस्कर यांनी घालून दिलेले संस्कार स्मरुन हे काम करत आहोत.समाजातील शिक्षक हा घटक संवेदनशील आणि जबाबदर घटक मानला जातो. त्यांच्या मार्फत सांगितली गेलेली गोष्ट संस्करक्षम वयात मुलांच्या मनावर प्रभावी पद्धतीन बिंबवली जाते. त्यामुळे नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यात शिक्षकांची भूमिका मोलाची असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com