पालकांकडून मुलाला कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात पोलिसही चक्रावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
पालकांकडून मुलाला कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात पोलिसही चक्रावले

पालकांकडून मुलाला कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात पोलिसही चक्रावले

पुणे - आई-वडीलांकडून मुलाला (Child) दोन वर्षे भटक्‍या श्‍वानांबाबत (Dog) कोंडून ठेवण्याच्या प्रकरणातील काही घटनांचा उगलडा केल्यानंतर आता पोलिसही (Police) चांगलेच चक्रावले आहेत. पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासात संबंधित मुलाने शाळेत कोणालाही चावा (Bite) घेतला नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच मुलगा सुदृढ व निरोगी असल्याचा वैद्यकीय अहवालही पोलिसांना प्राप्त झाला आहे, असे असतानाही आई-वडीलांकडून असे का केले जात होते, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

शाळेत भांडण केल्यानंतर मुलाने इतर मुलांच्या अंगावर धावून त्यांना चावा घेतल्यामुळे मुलाला दोन वर्षे घरात श्‍वानांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. चाईल्ड लाईन स्वयंसेवी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाची सुटका केली होती. त्याला बालगृहामध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी मुलाच्या आई-वडीलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले होते. मुलाचे वडील वाहन चालक असून ते खासगी वाहन चालवितात. तर आई गृहिणी आहे. त्यांना एकच मुलगा असून तिघेजण तेथे राहतात. त्यांच्या घरामध्ये 12 ते 14 श्‍वानेही आहेत.

पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यांनी संबंधित मुलाच्या शाळेत जाऊन, मुलाची कोणाबरोबर भांडणे झाली होती का ? त्याने कोणत्या मुलाला चावा घेतला होता का ? याबाबत विचारणा केली. मात्र असा कुठलाही प्रकार शाळेत घडला नसल्याचे त्यांना शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणीही केली. परंतु, त्याची तब्येत ठिक असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे वैद्यकीय अहवालातुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुलाचे वडील रस्त्यावर जखमी होऊन पडलेले, बेवारस श्‍वान घरी घेऊन येतात. त्यांचे औषधोपचार करुन त्यांना खाद्य देत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र त्यांनी मुलाला दोन वर्ष श्‍वानांसमवेत का ठेवले, याचा उलगडा पोलिसांना अद्याप झालेला नाही.

'मुलाने शाळेत अन्य मुलांना चावा घेतला नव्हता, त्याची तब्येतही चांगली आहे. त्यांच्या घरात 12 ते 14 भटके श्‍वान आढळून आले असून या प्रकरणाचा अजून तपास केला जात आहे.' वैभव सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे.

Web Title: Child Bite Dog Police Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policepunecrimeDog
go to top