चिमुकल्याच्या पोटात फुटला सेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

आळंदी - चऱ्होली (ता. खेड) येथील हुजैफ अब्दुल हमीद तांबोळी या ११ महिन्यांच्या चिमुकल्याने खेळता खेळता रिमोटचा बटन सेल गिळला. अन्ननलिकेत अडकून तो फुटला. मात्र, दुर्बिणीद्वारे तातडीने शस्त्रक्रिया करत हा सेल बाहेर काढण्यात आल्याने चिमुकला बचावला. ही घटना आज सकाळी घडली. हुजैफ याच्यावर पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोका टळला असून, तो सध्या सुखरूप आहे. 

आळंदीजवळील चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीत तनीष विकास सोसायटीत तांबोळी कुटुंबीय राहते. हुजैफ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झोपेतून जागा झाला. त्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत होते. खेळता खेळता त्याने टेबलवर ठेवलेला रिमोट घेऊन आपटला. त्यातून बटन सेल बाहेर पडला. त्या आवाजाने सगळे जागे झाले; पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळला होते. ही बाब हुजैफच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी भोसरीतील खासगी रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी काढलेल्या एक्‍स-रेमध्ये हा सेल हुजैफच्या अन्ननलिकेमध्ये अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर याठिकाणच्या डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून त्याला पिंपळे सौदागर येथील गॅस्ट्रो हब या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. मंदार डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास तत्काळ एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. हा सेल अन्ननलिकेत अडकल्याने या बालकाला त्रास होत होता, त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र, या बालकाला होणारा त्रास लक्षात घेता, त्याला भूल देण्यात आली. सुमारे एक तास दुर्बिणीच्या माध्यमातून केलेल्या शस्त्रक्रियेत हा सेल बाहेर काढण्यात यश आले. मात्र, हा सेल फुटल्याने सेलमधील केमिकलमुळे हुजैफच्या अन्ननलिकेला थोडी इजा पोचली होती. या शस्त्रक्रियेनंतर हे केमिकल काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. हुजैफच्या जिवाचा धोका टळला आहे. हुजैफचे वडील चाकणमधील एका खासगी कंपनीत काम करतात. काही वर्षांपासून त्यांचे चऱ्होलीतील तनीष विकास सोसायटीत वास्तव्य आहे.

Web Title: child cell surgery

टॅग्स