पीडित मुलांसाठी ‘बालस्नेही’ कक्ष; पुणे पोलिसांच्या पुढाकाराने उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भिंतींवर रेखाटलेली चित्रे, पुस्तके, खेळण्याची साधने त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्यासाठी  प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी... हे चित्र एखाद्या पंचतारांकित शाळेतील नसून, पुणे पोलिसांनी विधिसंघर्षित, पीडित, भिक्षेकरी मुलांसाठी सुरू केलेल्या बालस्नेही कक्षातील आहे. राज्यातील हा पहिलाच कक्ष असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पुणे - भिंतींवर रेखाटलेली चित्रे, पुस्तके, खेळण्याची साधने त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्यासाठी  प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी... हे चित्र एखाद्या पंचतारांकित शाळेतील नसून, पुणे पोलिसांनी विधिसंघर्षित, पीडित, भिक्षेकरी मुलांसाठी सुरू केलेल्या बालस्नेही कक्षातील आहे. राज्यातील हा पहिलाच कक्ष असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनवधानाने हातून गुन्हा घडलेली मुले भविष्यात गुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यांच्यातून जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गतच्या पथकाकडून बालस्नेही कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाउनमुळे हे काम रखडले होते. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलिस दलाचा कारभार हाती घेतल्यानंतर बालस्नेही कक्षाची माहिती घेऊन ते अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिस व होप फॉर द चिल्ड्रन संस्थेच्या सहकार्याने लष्कर पोलिस ठाण्यात ‘बालस्नेही कक्ष’ सुरू करण्यात आला.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, प्रियांका नारनवरे, महिला व बाल विकास अधिकारी अश्‍विनी कांबळे, होप फॉर चिल्ड्रन संस्थेच्या कॅरोलिन वॉल्टर आदी उपस्थित होते. 

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

बाल हक्क संरक्षण कायदा २०१५, नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्‍शन ऑफ चाइल्ड राइट यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बालस्नेही कक्षाची रचना करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण व कॅरोलिन वॉल्टर यांनी या कक्षाची संकल्पनेची माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

कक्षाची वैशिष्ट्ये 

  • मोकळ्या व घराप्रमाणे वातावरणात होणार बालकांच्या तक्रारींचे निवारण
  • विधिसंघर्षित मुलांचे पुनर्वसन व बालकांसाठी सुरक्षित वातावरण  
  • समुपदेशनासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक
  • पोलिस ठाण्याशी संबंध येणार नाही, असे स्वतंत्र प्रवेशद्वार
  • चित्रांनी सजवलेली खोली, खेळणी, पुस्तके व मनोरंजनाची साधने  

भविष्यात पोलिस वेगवेगळे उपक्रम राबविणार असून, त्यापैकी बालस्नेही कक्ष हे एक पाऊल आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास अन्य पोलिस ठाण्यांतही कक्ष सुरू करू.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त  

पोलिस ठाण्यातील वातावरण नागरिकांसाठी अनुकूल असले पाहिजे. विधिसंघर्षित बालकांसाठी असा कक्ष सुरू करणे हे पोलिसांचे सकारात्मक पाऊल आहे.
- अभय करंदीकर, संचालक, आयआयटी कानपूर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child friendly room for victimized children initiative of Pune Police