मुलांमधलं ‘मूल’ झालं चिडचिडं, आक्रमक! ‘सोशल कनेक्ट’ तुटल्याचा परिणाम

कोरोनाच्या सावटामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. परिणामी मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया होत नाही.
मुलांमधलं ‘मूल’ झालं चिडचिडं, आक्रमक! ‘सोशल कनेक्ट’ तुटल्याचा परिणाम

पुणे - कोथरूड येथे राहणारा नऊ वर्षांचा सोहम कुलकर्णी (Soham Kulkarni) हा कुटुंबातील सदस्यांसोबत फार संवाद (Discussion) साधत नाही. कोरोना काळात त्याची चिडचिड (Irritability) वाढली आहे. गेल्या वर्षभरापासून तो घरातूनच ऑनलाइन शिक्षण (Online Education) घेत आहे. त्यामुळे मित्रांना भेटणे कमी झाले आहे. सतत चार भिंतींच्या जगात राहून तो हल्ली आक्रमक झाला आहे. असच काही सोहमसारख्या इतर मुलांच्या बाबतीतही होत आहे. तसेच त्यांच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रिया थांबल्यामुळे त्यांचा ‘सोशल कनेक्ट’ (Social Connect) तुटत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक सांगत आहेत. (Child Irritability Social Connect Break Effect)

कोरोनाच्या सावटामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. परिणामी मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया होत नाही. मुलांच्या निकोप वाढीकरिता ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रक्रियेची सुरवात प्रामुख्याने शाळेपासून होते. साधारणपणे तीन ते चार वर्षांपर्यंतची मुलं भाषा, नाती, समायोजन, शिस्त, आदर, आहाराची ओळख, संयम अशा अनेक गोष्टी कुटुंबातील मोठ्यांना पाहून शिकतात व त्याचे अनुकरण करतात. त्या अनुषंगाने पालकांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलांसमोर आपले वर्तन त्या प्रमाणे ठेवावे. तसेच भाषा, स्वभाव, बोलतानाची शैली याबाबत मुलांना मार्गदर्शन करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मुलांमधलं ‘मूल’ झालं चिडचिडं, आक्रमक! ‘सोशल कनेक्ट’ तुटल्याचा परिणाम
माळेगावकरांनो, पाणी प्यायचे असेल तर वीजबिल भरा !

सध्या मुलांसोबत त्यांचे पालक ही घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे पालकांनीच मुलांच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेसाठी प्रयत्न करायला हवे. मुलांना आनंदी ठेवण्याचा जास्ती जास्त प्रयत्न करावा. तसेच सामाजिक गोष्टी शिकविण्यासाठी घरातच गमतीजमतीचे प्रयोग करावे.

- डॉ. नितीन अभिवंत, प्रमुख, मनोविकृतीशास्त्र विभाग, ससून रुग्णालय

मुलांचे सामाजिकीकरणाची प्रक्रिया अवघड असली तरी पालकांच्या प्रयत्नांमुळे ते घरी ही शक्य आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशी एकत्रित व्यायाम, स्वयंपाक, घर आवरणे किंवा एखादा खेळ खेळावे. ऑनलाइन सोशल ग्रुप्स किंवा अॅक्टिव्हिटी ग्रुपमध्ये सहभागी होण्यास आपल्या मुलांना प्रोत्साहन करणे अशा विविध प्रकारे पालक मुलांना सामाजाशी जोडू शकतात.

- स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक

मुलांवर होणारे परिणाम

  • शारीरिक हालचाल कमी झाल्याने लठ्ठपणा वाढतोय

  • मानसिक व शारिरिक विकास मंदावले

  • स्वभावातील एकलकोंडीपण वाढत आहे

  • दिनक्रम विस्कळित झाल्यामुळे झोप, आहार, दैनंदिन कार्य यावरही विपरीत परिणाम

हे करणे गरजेचे

  • मुलांना आधार व विश्वास देणे

  • मुलांना स्पर्शाच्या माध्यमातून आधार, प्रेम देणे गरजेचे

  • मुलांचे ‘हॅप्पी हॉर्मोन्स’ (संप्रेरक) वाढविण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ, छंद जोपासावेत

  • त्यांची बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी म्हणून ग्रुप ॲक्टिव्हिटी करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com