चिमुकलीला वाचविण्यासाठी आई-वडिलांची प्राणांची बाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - जिवावर बेतलेल्या संकटातून आपल्या दीड वर्षाच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या प्राणांची बाजी लावल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी झालेल्या वारज्याच्या पीएमपी बस अपघातात पाहायला मिळाली...

रस्त्यावरून जाणारी बस वारज्याच्या पुलावरून पंधरा फूट खाली कोसळली. या अपघाताची माहिती देणारा पहिला दूरध्वनी सकाळी दहा वाजून ४९ मिनिटांनी ‘१०८’ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये वारज्यातील रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली. त्या रुग्णवाहिकेतील डॉ. सचिन देठे ‘सकाळ’शी बोलत होते.

डॉ. देठे म्हणाले, ‘‘घटनास्थळी पोचलो तेव्हा फक्त अपघातग्रस्त प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. पोलिसांच्या मदतीने बसचा आपत्काळात बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला. त्यातून गंभीर जखमी रुग्णांना तातडीने जवळच्या माई मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्या वेळी अपघातातील दीड वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. या अपघातात मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी आई-वडिलांनी क्षणार्धात तिला दोघांच्यामध्ये घेतले. त्यामुळे तिला या अपघातात कोणतीही मोठी इजा झाली नाही. मात्र, आईला डोक्‍याला, कपाळाला, डोळ्याजवळ इजा झाली. वडिलांनाही पाठीला मार लागला होता. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.’’

Web Title: Child Life saving Mother Father Bus Accident