‘मधुरांगण-किड्‌स कार्निव्हल’मध्ये मुलं रमली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाचे तिकीट
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत दिवसभर गॅझेट्‌समध्ये गुंतून राहण्यापेक्षा काही तरी नवीन शिकायला मिळणार, स्वत:च्या हाताने नवीन गोष्टी करायला मिळणार, या उत्साहातून ‘सकाळ-मधुरांगण’ने आयोजिलेल्या एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये ७ ते १५ वयोगटातील मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाचे तिकीट
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत दिवसभर गॅझेट्‌समध्ये गुंतून राहण्यापेक्षा काही तरी नवीन शिकायला मिळणार, स्वत:च्या हाताने नवीन गोष्टी करायला मिळणार, या उत्साहातून ‘सकाळ-मधुरांगण’ने आयोजिलेल्या एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये ७ ते १५ वयोगटातील मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

‘कुकिंग विदाउट फायर’ या संकल्पनेनुसार शेफ प्रसाद कुलकर्णी यांनी मुलांना ब्ल्यू क्‍युरासो, लिंबू, सोडा, साखर, पुदिना, सब्जा घालून ‘ब्ल्यू लगून’ हे मॉकटेल, किसलेले गाजर, बारीक कोबी, मियोनिज सॉस, बेदाणे, मीठ, मिरी यांचा वापर करून तयार केलेले कोलेस्लॉ सलाड सॅंडविच, तसेच ओली भेळ आदी पदार्थ तयार करायला शिकविले.

आर्टिस्ट गौरव काईगडे यांनी मुलांना क्‍लेपासून अवघ्या पाच मिनिटांत वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची शिल्पे तयार करायला शिकवली. सागर देशमुख आणि त्यांच्या टीमने प्लॅंटेशनविषयीची माहिती दिली. गच्चीवरच्या किंवा गॅलरीतील बागेत कोणती रोपे, कोणत्या ऋतूत, कोणत्या आकाराच्या कुंडीत, किती माती, खत, पाणी घालायचे याची प्रात्यक्षिकासह माहिती मुलांनी जाणून घेतली. या वेळी मुलांना ‘सॉइल बॉक्‍स ज्युनिअर’ हे ३५० रुपये किमतीचे कीटही भेट म्हणून मिळाले. अगोदर उत्सुकता, नंतर आश्‍चर्य आणि मग स्वनिर्मितीचा आनंद या बालचमूंच्या भावनांनी ‘मॅजेंटा लॉन्स’चा परिसर गजबजून गेला होता. कार्निव्हलमधून परतताना पाल्यांच्याच नव्हे, तर पालकांच्या मनातही एकच उत्सुकता होती... आता पुढील ‘किड्‌स कार्निव्हल’ केव्हा ? या उपक्रमाचे प्रायोजक मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. व त्रिविध ॲग्रो टेक सोल्युशन्स होते.

आजही व्हा ‘मधुरांगण’चे सभासद !
‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी रविवारी (ता. ३०) पिंपरी कार्यालयात सकाळी ११ ते ६ तसेच, पुणेरी फेस्टिव्हलमध्ये राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे ‘सकाळ-मधुरांगण’च्या स्टॉलवर सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत. आज जे ‘मधुरांगण’चे सभासद होतील, त्यांना ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका भेट म्हणून मिळेल. नाटक १ मे रोजी दुपारी १२.३० वा टिळक स्मारक येथे आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ः ९०७५०१११४२, ८३७८९९४०७६

Web Title: child madhurangan kids carnival roam