बालशास्त्रज्ञ होण्याची संधी !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांचा हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ ठिकाणी होणार आहे.

या उपक्रमात दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा वैज्ञानिक मॉडेल विद्यार्थी स्वत: बनवतात. त्यांनी तयार केलेली मॉडेल नंतर ते घरी घेऊन जातात. त्यातून घरी त्यांची प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी जून २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान २३ रविवारी एकत्र जमून प्रयोगातून विज्ञान शिकणार आहेत.

इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी या काळात हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरीस्कोप, सूर्यमाला या विषयांवर ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. पाचवी व सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार केला असून त्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल.

सातवी ते नववीमधील विद्यार्थी सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मॉडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा असे ४० पेक्षा जास्त प्रयोग करतील. 

यासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

सर्व साहित्यासह शुल्क
 तिसरी व चौथी - ४,८०० रुपये
 पाचवी व सहावी - ५,६०० रु.
 सातवी ते नववी - ६,८०० रु.
 शुल्क रोखीने किंवा धनादेशाद्वारे भरता येईल
 संपर्क - ९६०७२०८५५२ किंवा ९३७३०३५३६९

Web Title: child scientist