चला बालशास्त्रज्ञ होऊयात!

Scientist
Scientist

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’तर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये २१ एप्रिलपासून सुरू होत आहे.

दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा सायन्स मॉडेल प्रत्येक विद्यार्थी स्वत: हाताने बनवतात आणि तयार केलेले साहित्य त्यांनाच घरी मिळते, ज्यातून त्यांची प्रयोगशाळा घरी तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान २३ रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करत विज्ञान शिकणार आहेत. 

इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गातील मुले या कालावधीत सुमारे ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरीस्कोप, सूर्यमालेसारखे प्रकल्प तयार करतील. पाचवी व सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार केला असून, विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल. सातवी ते नववीमधील विद्यार्थी या उपक्रमात सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मोडेल, हायड्रोलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा तयार करणे असे सुमारे ५० प्रयोग व प्रकल्प स्वत: हाताने बनवतात. नुसते प्रयोगच नाही तर विविध गोष्टींचे निरीक्षण करणे, त्यांच्या नोंदी घेणे अशा सवयीही मुलांना आपोआपच लागतात. यासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

सर्व साहित्यासह शुल्क
  तिसरी व चौथी - ४८०० रु. 
  पाचवी व सहावी - ५८०० रु.
  सातवी ते नववी - ६८०० रु. 
  दोन धनादेश/ रोख आणावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com