आईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या

संदीप घिसे 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मित्रांची नावे आहे. वैभव गजानन काळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई अर्चना काळे (वय ३७, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी)) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मित्रांची नावे आहे. वैभव गजानन काळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई अर्चना काळे (वय ३७, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी)) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे जण वैभव काळे यांचे मित्र  आहेत. दोन्ही आरोपी यांनी वैभव त्यांच्या आईबाबत अपशब्द वापरले. हे सहन न झाल्याने वैभव याने १० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. माने करीत आहेत.

Web Title: Child suicide due to abuse of mother in Pimpri

टॅग्स