बालकामगारप्रकरणी व्यावसायिकाला शिक्षा

Court
Court

पुणे - बालकामगारांना कामावर ठेवल्याप्रकरणी बेकरी व्यावसायिकाला न्यायालयाने तीन महिने कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी हा आदेश दिला. 

शमीम अहमद युसूफ अन्सारी (वय ५०, रा. सुखसागरनगर, कात्रज) असे या व्यावसायिकाचे नाव. 

याबाबत जुनी सांगवी येथीला एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 
भारती विद्यापीठ पोलिसांनी २२ मे २०१५ रोजी केलेल्या कारवाईत अन्सारी याने दोन अल्पवयीन 
मुलांना कामावर ठेवल्याचे उघड झाले होते.

पावाच्या लाद्या उचलून ठेवणे आणि इतर कामे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अन्सारी हा विनापरवाना ‘बेस्ट बेकर्स’ नावाने बेकरी चालवत होता. 

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com