बच्चे कंपनीत सांताक्‍लॉजचे खास आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पिंपरी - ख्रिसमससाठी सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली असून, सर्वत्र ख्रिस्ती बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बच्चे कंपनीत सांताक्‍लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्‍लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी होत आहे.

पिंपरी - ख्रिसमससाठी सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली असून, सर्वत्र ख्रिस्ती बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बच्चे कंपनीत सांताक्‍लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्‍लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी होत आहे.

नाताळनिमित्त बाजारपेठेबरोबरच उपनगरातील रस्तोरस्त्यावर लाल रंगाचा सांताक्‍लॉजचे ड्रेस, लाल रंगाच्या टोप्या, मुखवटे दाखल झाले आहे. सजावटीचे साहित्यामध्ये विविध आकारांतील केक, विविध रंगांच्या दिव्यांच्या माळा, गोल्डन बेल्स बॉल, लाल रंगाच्या टोप्या, सांताक्‍लॉजचे मास्क, प्लॅस्टिकचे ट्री, स्टार आदींनी बाजारपेठ सजली आहे.

बाजारात सांताक्‍लॉजचे मास्क ५५ रुपयांपासून ते १२०० च्या पुढे आहेत. दोरीवर चालणारा, घोडागाडीवर स्वार असलेला; तसेच दोरीवरून सायकल चालविणारा सांताक्‍लॉजही बाजारात दाखल झाला आहे. आकर्षक अशा ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी असून, ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठींच्या वस्तूंचे पॅकेज बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत २७० रुपयांपासून सुरू होते. ख्रिसमससाठी ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपेक्षा अधिक किमतीत डेकोरेटिव्ह कॅंडलसेट, जेलीटेप, स्टॅंड विथ कॅंडल, सुवासिक कॅंडल अशा आकर्षक कॅंडल मिळत असून मदर मेरी, जीझस, सांताक्‍लॉज अशा विविध आकारांच्या आकर्षक मूर्तींना विशेष मागणी आहे. मुलांना सांताक्‍लॉजचे विशेष आकर्षण असल्याने मुलांना गिफ्ट देण्यासाठी पालकांची गिफ्टची खरेदी सुरू आहे.

गव्हाण सजावटीला महत्त्व
ख्रिस्ती बांधवांच्या वतीने येशूच्या जन्मावर आधारित छोटेखानी देखाव्यांचीही तयारी सुरू आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला. ख्रिस्ती बांधव चर्चसह घरी तशी गव्हाण देखाव्यांच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी बाजारात गव्हाणी साहित्य उपलब्ध आहे.

Web Title: Children in the company of Santa Claus attraction