मुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी

मुलांनी मनसोक्त आनंदाचा ठेवा जपावा - डॉ. कुलकर्णी

पुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे काढावीत. मात्र, त्या सगळ्यांतून भरभरून आनंद मिळणे महत्त्वाचे आहे, गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘सकाळ’च्या बालवाचकांना खास बालदिनानिमित (१४ नोव्हेंबर) हा सल्ला दिला.

ते म्हणाले, ‘‘आपण जे काही करू, त्याची मजा घेताना मुलांनी हेही लक्षात ठेवायला हवे, की सामूहिकतेची भावना जोपासली जावी. माझे सारे चांगले व्हावे व दुसऱ्याचे वाईट, हे मनात येऊच नये. कलावंत एकट्याने मोठा होत नसतो. अनेकांचे सहकार्य त्यामागे असते. त्या सगळ्यांबद्दलची जाण ठेवायला हवी. अवतीभवतीचे जग तुम्हाला एकट्याने मोठे करू पाहते. इतरांना वाईट म्हणायला शिकवते. आपण तसे होऊ नये.’’

डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, की रस्त्यावरचे वाटेल ते खाणे टाळावे. ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. जीवनसत्त्वयुक्त उत्तम आहार असावा. भाज्या व फळे खावीत, हे मी डॉक्‍टर म्हणून मुलांना सांगतो. तेच चांगले विचार व संगीतासारख्या कलेबाबतही आहे. सांस्कृतिक भरणपोषण होण्यासाठी पालकांनी मुलांना चांगले संगीत म्हणजे नेमके काय, ते लक्षात आणून दिले पाहिजे. दर्जेदार कविता व गाणी मुलांनी ऐकायला हवीत. फक्त रिॲलिटी शोपुरतेच गाणे नसते. ज्या गाण्यातून, संगीतातून मनाला समाधान मिळते ते गाणे चांगले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com