बारामतीत रेषांच्या भाषेतून चिमुकल्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

बारामती - जागतिक व्यंग्यचित्र दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ’च्या वतीने सकाळ सोसायटी संवाद या उपक्रमांतर्गत येथील सिद्धेश्वर गल्ली येथील सिद्धेश्वर मंदिरात शेकडो विद्यार्थ्यांनी रेषांची भाषा जाणून घेतली. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

बारामती - जागतिक व्यंग्यचित्र दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ’च्या वतीने सकाळ सोसायटी संवाद या उपक्रमांतर्गत येथील सिद्धेश्वर गल्ली येथील सिद्धेश्वर मंदिरात शेकडो विद्यार्थ्यांनी रेषांची भाषा जाणून घेतली. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

येथील सिद्धेश्वर मंदिरात आयोजित उपक्रमात शहरातील सिद्धेश्वर गल्ली, गोकूळवाडी, श्रावणगल्ली, मारवाड पेठ, खाटिकगल्ली या परिसरातील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यंग्यचित्रकार डॉ. शिवाजी गावडे यांनी व्यंग्यचित्रांची दुनिया या विद्यार्थ्यांपुढे अतिशय सोप्या कृतीतून सादर केली. चित्रे कशी रेखाटावीत, रेषांची आखणी व रेखीवपणा केला की चित्रे कशी अगदी सहजगत्या जमून जातात, याचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांच्या मनातील चित्रकलेतील मानवी रेखाटनांविषयीचे कुतूहल जागवले. या उपक्रमात ‘सकाळ’चे जाहिरात विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक घनश्‍याम केळकर यांनी मुलांना इसापनीतीच्या गोष्टी सांगून मुलांमध्ये आत्मविश्वास जागवला.

या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. वयोगटानुसार दिलेली चित्रे रेखाटली. या वेळी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णूपंत चौधर, रुईचे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर उपस्थित होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाकीर बागवान, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेश दाते, हार्दिक गुजराथी, बॅंक अधिकारी महेश पाठक आदींनी या अभिनव उपक्रमास सहकार्य केले. 

या कार्यक्रमास ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक योगेश निगडे, साहाय्यक व्यवस्थापक शशिकांत जगताप, गणेश चव्हाण, संजय घोरपडे आदी उपस्थित होते. बारामती विभागीय कार्यालयाचे सहायक वितरण व्यवस्थापक मनोज काकडे यांनी सूत्रसंचालन केले. 

तासात स्पर्धा व अर्ध्या तासात निकाल
स्पर्धेनंतर परीक्षकांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला व बक्षीस वितरणही केले. स्पर्धेत पहिली ते दुसरीच्या ‘अ’ गटात प्रतीक्षा अनिल क्षीरसागर हिने प्रथम, दक्ष पवार याने द्वितीय, तर अनुज संतोष गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळवला. या गटात अवधूत बरडे व इशान यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. चौथी ते सहावीतील विद्यार्थ्यांच्या ब गटात यश सम्राट शहा याने प्रथम, निवेदिता शरद देवकुळे हिने द्वितीय, तर समृद्धी किरण सोनवणे हिने तृतीय क्रमांक मिळवला. या गटात भक्ती रवींद्र तपकिरे व नेत्रा नितीन काकडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. सातवी ते नववीतील क गटात वैष्णवी बाळासाहेब चव्हाण हिने प्रथम, प्रणिता अनिल कालगावकर हिने द्वितीय, तर अनुष योगेश खलाटे याने तृतीय क्रमांक मिळवला. या गटात संस्कार दिनेश वाघ व नीलेश तावरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. 

Web Title: children dialogue From linear language Sakal Society Dialogue in baramati