पाझर तलावामध्ये दोन मुले बुडाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कात्रज - गुजरवाडी-निंबाळकरवाडी येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी यश रोहिदास बालवडकर (वय १५) व प्रशांत ज्ञानेश्वर धिंडाले (वय १३) यांचा तलावात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. पाणबुडीच्या साहाय्याने गुरुवारी (ता. १३) सकाळी त्यांचा शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शाळांना सुट्या असल्यामुळे निंबाळकरवाडीतील यश बालवडकर व प्रशांत धिंडाले यांच्यासह ओंकार दादा बालवडकर, सनी पंडित निंबाळकर, रोहन अनिल निंबाळकर, क्षितिज विजय घाटे हे सहा जण तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाझर तलावात सकाळी साडेअकरा वाजता पोहायला गेले होते. साडेबाराच्या सुमारास यश आणि प्रशांत हे पोहताना बुडाले. त्यांच्या मित्रांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडत नसल्याने चौघेजण गावात परतले आणि पालकांना माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांसह अग्निशामक दलाला माहिती दिली. दोनच्या सुमारास घटनास्थळी पोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. तलाव तुडुंब भरल्यामुळे खोलवर जाऊन जवानांनी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे गुरुवारी सकाळी पाणबुडीच्या साहाय्याने दोघांचा शोध घेणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व्ही. एम. म्हामुणकर, सी. एम. सूर्यवंशी व डी. व्ही. चौगुले यांनी दिली.

Web Title: children drawn in lake

टॅग्स