अल्पवयीनांकडून चोरीच्या तब्बल 15 दुचाकी जप्त

children have stolen bikes at Baramati
children have stolen bikes at Baramati

बारामती शहर - झटपट श्रीमंतीचा मोह अल्पवयीन मुलांसह जीवन घडवू पाहणाऱ्या युवकांनाही गुन्हेगारीच्या वाटेवर घेऊन चालल्याचे बारामतीत पुन्हा एकदा पुढे आले आहे. पालकांनी मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवणे किती अनिवार्य आहे हेच या दोन घटनांनी दाखवून दिले आहे. 

बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी शिवाजी निकम, संजय जगदाळे, सुरेंद्र वाघ, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, अभिजीत एकशिंगे, सदाशव बंडगर यांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

मजा करण्यासाठी पैसे मिळत नसल्याने मोटारसायकल चोरुन ती मिळेल त्या रकमेत विकून मजा करायची पुन्हा नवीन मोटारसायकल चोरायची असे ही दोन अल्पवयीन मुले करीत होती. बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार, वालचंदनगर-1, इंदापूर-1, दौंड-2, सातारा-1, पुणे रेल्वे स्थानक-1, लोणीकंद- 1, जामखेड-1 व इतर 3 अशा 15 दुचाकी पोलिसांनी शोधून आणल्या आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारा भगवान महादेव कांबळे (वय 24, रा. वांगी नंबर 2, ता. करमाळा, जि. नगर) याने इतर मित्रांकडे बुलेट आहे, आपल्याकडे नाही या न्यूनगंडातून बुलेट चोरीचा प्रयत्न केला खरा मात्र मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अलगद पकडला. अजित पोंदकुले यांच्या बंद घराच्या गेटचे कुलूप तोडून बुलेट चोरुन नेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने फसला आणि सरकारी सेवेची भगवानची स्वप्ने हवेतच विरली. पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही कामगिरी केली. 

मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे
आपली मुले कोठे जातात, काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत या कडे पालकांनी बारकाईने लक्ष ठेवायला हवे. मुलांना पालकांनी पुरेसा वेळ द्यायलाच हवा. - नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com