मुलंच होणार ‘हेल्थ मॉनिटर’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

जीवनशैलीला वळण लावणाऱ्या ‘हेल्थ का मॉनिटर’ डीव्हीडीचे आज प्रकाशन

जीवनशैलीला वळण लावणाऱ्या ‘हेल्थ का मॉनिटर’ डीव्हीडीचे आज प्रकाशन

पुणे - मधुमेह, रक्तदाबसारखे शब्द अलीकडे अयोग्य जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येक घरात ३० ते ५० वयोगटांतील व्यक्तींच्या तोंडून कानी पडू लागले आहेत. या जीवनशैलीचं पर्यावसन होतं ते मधुमेह व रक्तदाबासारख्या विकारांमध्ये आणि त्याकडे दुर्लक्षही केलं जातं. तसेच वडीलधाऱ्यांचे सल्ले धुडकावले जातात. मात्र, ७ ते १४ वयोगटातील मुलं ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे परिणामकारकरीत्या लक्ष देऊ शकतात. याच संकल्पनेतून ‘हेल्थ का मॉनिटर’ या डीव्हीडीची निर्मिती झाली आहे. यामध्ये मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही प्रकाश टाकला आहे.

‘हेल्थ का मॉनिटर’ या डीव्हीडीमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, बालरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला धारप आणि मनोविकार तज्ज्ञ डॉ. नीलेश नाफडे यांनी अनेक बाबींबाबत विश्‍लेषण केले आहे. तसेच, एकपात्री कलाकार डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे. ‘हेल्थ का मॉनिटर’ या एकाच डीव्हीडीमध्ये मराठी व इंग्रजी भाषेत भाष्य केले असून तिचे प्रकाशन रविवार (ता. २३) सायंकाळी ६ वाजता ‘मॅजेन्टा लॉन्स’ राजाराम पुलाजवळ, डी. पी. रस्ता, पुणे येथे होणार आहे. 

याप्रसंगी ‘माधवबाग’चे सीईओ डॉ. रोहित माधव साने उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. आपल्या पाल्याच्या संदर्भातील प्रश्‍नांची उत्तरे तज्ज्ञांकडून माहिती करून घेण्यासाठी आपले प्रश्‍न ७७२१९८४४४२ या नंबरवर आपले नाव व नंबरसह व डॉक्‍टरांच्या नावासहित वॉट्‌सॲप करा. निवडक प्रश्‍नांची उत्तरे तज्ज्ञांतर्फे कार्यक्रमात दिली जातील. 

मधुरांगण- ‘सकाळ’ मीडिया ग्रुपची प्रस्तुती असलेल्या ‘हेल्थ का मॉनिटर’चे माधवबाग, व्हीआरटी व एन. एम. कम्युनिकेशन हे प्रायोजक आहेत. ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’ यांनी ॲनिमेशन केले असून, संकल्पना ‘सकाळ’च्या मुख्य व्यवस्थापिका (ब्रॅंड प्रमोशन व इव्हेंट) नेहा नगरकर यांची आहे. डीव्हीडीला संगीतकार अविनाश-विश्‍वजित यांनी संगीत दिले आहे. सूत्रसंचालन अभिनेत्री चित्रा खरे करणार आहेत.

‘हेल्थ का मॉनिटर’ होण्यासाठी आजच आपले व आपल्या पाल्याचे नाव नोंदवा.
संपर्क - ९०७५०१११४२, ८३७८९९४०७६

डीव्हीडीची वैशिष्ट्ये
मूळ किंमत ३५० रुपये - प्रकाशनपूर्व सवलत - २५० रुपये.
डीव्हीडी खरेदी करणाऱ्या पहिल्या ३०० जणांना खालीलपैकी कोणतीही एक ट्रीप विनामूल्य. (एका व्यक्तीसाठी)
बक्षीस प्रायोजक - सूर्यशिबिर रिसॉर्टतर्फे ९०० रुपयांची एकदिवसीय सहल व इतरांना पाच टक्के सूट - ९८२२०५७४८७
‘ढेपेवाडा’तर्फे ११०० रुपयांची एकदिवसीय सहल मोफत - ९८२२६४०५९९  
गो क्रेझी ॲडव्हेंचरपार्क तर्फे ५५० रुपये किमतीच्या ॲडव्हेंचर ॲक्‍टिव्हिटी मोफत.

Web Title: children to health monitor