मुलांना वाचवले पण जीव गमावला

सोसायटीच्या गार्डनमध्ये नाग असल्याचे कोकोने पाहिले. त्यामुळे त्याने नागाला चावा घेतला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत नागाने त्याचा मानेला दोनदा दंश केला. मात्र तरीही देखील त्याने नागाला चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला.
मुलांना वाचवले पण जीव गमावला

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण होत असल्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. मात्र वडगावशेरीतील अशाच एका भटक्या कुत्र्याने सोसायटीच्या गार्डनमध्ये घुसलेल्या कोब्रा नागाला मारुन मोठा अनर्थ टाळला आहे. मात्र नागाने ‘कोको’ला दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला.

वडगावशेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीच्या गार्डनमध्ये शुक्रवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोसायटीच्या समोरच एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये सोसायटीत लहान मुले नियमीत खेळण्यासाठी जात असतात. तर कोको हा त्या सोसायटीच्या परिसरातील एक भटका श्‍वान आहे. सोसायटीतील काही नागरिक त्याला नियमित खाद्यपदार्थ टाकत असतात. शुक्रवारी दोन वाजता सोसायटीच्या गार्डनमध्ये नाग असल्याचे कोकोने पाहिले. त्यामुळे त्याने नागाला चावा घेतला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत नागाने त्याचा मानेला दोनदा दंश केला. मात्र तरीही देखील त्याने नागाला चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळात कोको देखील बेशुद्ध पडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला त्वरित डॉक्टरकडे नेले. मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते.

याबाबात सोसायटीत राहणा-या प्राणीप्रेमी दिव्या सिंह यांनी सांगितेल की, शुक्रवारी दुपारी आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये नाग आल्याचे व कोकोने त्याला चावल्याचे मला समजले. त्यामुळे मी त्वरित गार्डनमध्ये गेले. सापाला मारल्यानंतर कोको देखील बेशुद्ध झाला होता. त्यामुळे आम्ही त्याला जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. मात्र तोपर्यंत त्याला मृत्यू झाला होता. सर्पमित्रांनी संबंधित नाग हा कोब्रा जातीचे असल्याचे आम्हाला सांगितले.

मुलांना वाचवले पण जीव गमावला
आंबेगाव खुर्दमधील पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध "मोका" अंतर्गत कारवाई

मी त्याला रोज खायला द्यायचे प्राण्यांवरील प्रेमापोटी मी कोकोसह अनेक भटक्या कुत्र्यांना मी रोज खायला टाकायचे. गार्डनमध्ये दररोज मुले खेळतातच, काही सदस्य मॉर्निंग वॉकला देखील येतात. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाला हा नाग चावला असता तर त्यांना जीव गमवावा लागला असता. हे सर्व कोकोमुळे टळले.

- दिव्या सिंह [प्राणीप्रेमी व सोसायटीतील रहिवासी

कोकोवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार :

कोब्रा कोणाला चावला असता तर त्यातून होणारी दुर्घटना कोकोमुळे टळली. शेवटी त्याचा देखील जीव होताच. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले, अशी माहिती सोसायटीतील नागरिकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com