आदिवासी भागातील मुलांचे पुणे दर्शन 

रविवार, 13 मे 2018

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील छोट्या गावांमधून १० मुले आणि १० मुलींना पुणे दर्शनसाठी आणले आहे. या मुलांपैकी काहींच्या गावात आजही लाईट पोहचली नाही. अनेकांच्या शाळेत आठवड्यातून केवळ 1 ते 2 तास शिक्षण दिले जाते. अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने 'मामाच्या गावाला जाऊया' ह्या उपक्रमाअंतर्गत ही मुले पुण्यात आली आहेत. यावर्षी त्यांच्यासाठी ११ मे ते १६ मे दरम्यान ' स्वप्न पहा आणि मोठे व्हा' अशी थिम ठेवण्यात आली आहे. या मुलांनी पुण्यात येऊन फक्त सहलीचा आनंद घेण्यापेक्षा त्यांना विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या जात आहेत. कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांची रहाण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समिती, पुणे येथे करण्यात आली आहे.

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील छोट्या गावांमधून १० मुले आणि १० मुलींना पुणे दर्शनसाठी आणले आहे. या मुलांपैकी काहींच्या गावात आजही लाईट पोहचली नाही. अनेकांच्या शाळेत आठवड्यातून केवळ 1 ते 2 तास शिक्षण दिले जाते. अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने 'मामाच्या गावाला जाऊया' ह्या उपक्रमाअंतर्गत ही मुले पुण्यात आली आहेत. यावर्षी त्यांच्यासाठी ११ मे ते १६ मे दरम्यान ' स्वप्न पहा आणि मोठे व्हा' अशी थिम ठेवली आहे. या मुलांनी पुण्यात येऊन फक्त सहलीचा आनंद घेण्यापेक्षा त्यांना विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या जात आहेत. कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांची रहाण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समिती, पुणे येथे करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी आंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील, विद्यार्थी सहायक समीताचे प्रभाकर पाटील, मराठवाडा मित्र मंडळाचे भाऊसाहेब जाधव, ब्लेड्स ऑफ ग्लोरीचे रोहन पाटे, राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील अधिकारी वर्ग, तसेच पेशवे पार्क दाखवण्यासाठी गणेश साळेगावकर, सागर वडके आणि अजय पवार सहकार्य करत आहेत.

गेल्या दोन दिवसांत मुलांना शनिवारवाडा, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय आणि बालेवाडी क्रीडा संकुल दाखवले आहे. पुढील दिवसांमध्ये सिंहगड किल्ला, लोणीकंद येथील राज कपुर स्टुडीओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट, आयुका, फर्ग्युसन महाविद्यालय, चिंचवड येथील सायन्स पार्क, बर्ड व्हॅली या ठिकाणच्या भेटी घडवण्यात येणार आहेत.

Web Title: children for tribal area visit for pune