विद्यार्थ्यांनी घेतली बॅंक व्यवहाराची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

शालेय वयातच पहिल्यांदाच बॅंकेचे व्यवहार जाणून घेण्याची उत्सुकता, बॅंक व्यवहाराबद्दल असलेले कुतूहल या भावविश्‍वात विद्यार्थी रममाण झाले होते. निमित्त होते सकाळ एनआयई आयोजित बालदिनानिमित्त क्षेत्र भेटीचे.

पुणे - शालेय वयातच पहिल्यांदाच बॅंकेचे व्यवहार जाणून घेण्याची उत्सुकता, बॅंक व्यवहाराबद्दल असलेले कुतूहल या भावविश्‍वात विद्यार्थी रममाण झाले होते. निमित्त होते सकाळ एनआयई आयोजित बालदिनानिमित्त क्षेत्र भेटीचे.

बॅंकेत पैसे सुरक्षित कसे राहतात?, आरटीजीएस म्हणजे काय?, नोटांची डिझाइन कोण करते?, पहिली बॅंक कोणती?, व्याजदर कसा ठरवितात? सहकारी, मल्टिस्टेट बॅंक म्हणजे काय? यांसारख्या अनेक प्रश्‍नाद्वारे विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्याशी संवाद साधला.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (उपक्रमांतर्गत भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप 
सोसायटी लिमिटेडला भेट दिली. या वेळी विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, शाखा व्यवस्थापक दिलीप काशीकर, शीतलकुमार ठाकूर, ‘सकाळ’चे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) सी. बी. वर्गिस, परेश गुल्हाने, शिक्षिका प्राची गोऱ्हे, वैशाली गर्गे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व त्यांना बॅंक व्यवहाराची माहिती व्हावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते. या वेळी सोनाली सस्ते यांनी विद्यार्थ्यांना बॅंक व्यवहारांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील अनेक प्रश्‍न विचारत बॅंक अधिकाऱ्यांची मने जिंकली. या वेळी जाधव यांनी विद्यार्थ्यांना शालेय वयातच बचतीचा सल्ला देत बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens day nie student bank transaction information