कष्टक-यांच्या मुलांनी लुटला रक्षाबंधन व दहीहंडाचा आनंद

sanghvi
sanghvi

जुनी सांगवी - आजच्या धकाधकीच्या युगात मजुर कष्टकरी वर्गाला काळजी असते ती कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा विविध प्रांतातुन आलेला कषटकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची मुले शिक्षणापासुन वंचित राहतात.ईच्छा असुनही केवळ गरीबी व बोलीभाषेमुळे शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलांसाठी पिंपळे गुरव परिसरात मराठवाडा जनविकास संस्थेच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम ह्या वस्तीशाळा चालवतात. दिवसभर आई वडील कामावर असताना ही मुले कचरा, भंगार गोळा करून कुटुंबाला मदत करतात. 

संस्थेच्या पुढाकाराने यातील बहुतांश मुले पालिकेच्या शाळेत जावू लागली आहेत. तर अजुनही अनेक मुले शिक्षणापासुन वंचित आहेत. दर शनिवारी व रविवारी यांचे एकत्रिकरण करून शिक्षण व संस्काराच्या प्रवाहात आणण्यासाठी पिंपळे गुरव येथे वस्तीशाळा भरवली जाते.ईतरांप्रमाणे सण, उत्सवातील आनंद या मुलांच्या वाट्याला यावा यासाठी वस्तीशाळेवर रक्षाबंधन व दहीहंडी उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला."पुस्तक व सामाजिक संदेश पत्रके लावुन ही दहीहंडी साजरी करण्यात आली.याचबरोबर सण उत्सवामागील उद्देश मुलांना समजावण्यात आला. "जात पात सोडा,मानवता धर्म जोडा", आम्हाला हवी स्वच्छ हवा, म्हणुन सर्वांनी झाडे लावा, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, सारे शिकुया,पुढे जाऊया, बेटी बचाओ,बेटी पढाओ असे संदेश लावण्यात आले होते.

यावेळी मराठवाडा संघाचे अरूण पवार, स्विकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेविका माई ढोरे, आदीती निकम, प्रकाश बंडेवार, श्रीकृष्ण फिरके, श्रीकृष्ण खडसे, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com