बच्चेकंपनीसाठी बालचित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - लहानपणापासूनच मुलांना कथा, गोष्टी, चित्रपटांचे आकर्षण असते. मुलांना जगभरातील बालचित्रपटांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’, बालचित्रपट समिती (सीएफएसआय), सी. एम. इंटरनॅशनल स्कूल आणि ब्रेकफास्ट ॲट सिनेमा यांच्यातर्फे बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत गट्टू, द झिग झॅग कीड, छोटा सिपाही यांसारख्या जगभरातून निवडलेल्या लहान मुलांच्या अनेक गोष्टी दाखविणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा, संवाद आणि गटचर्चा आयोजिल्या आहेत. ही कार्यशाळा चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी या वयोगटासाठी आयोजित केली जाईल. पहिली ते तिसरीतील विद्यार्थी ‘स्टोरी टाइम फॉर टॉट्‌स’ या कार्यशाळेत भाग घेऊन त्यांची गोष्ट सादरीकरणाचे कौशल्य दाखवू शकतात. सहभागी होऊ इच्छित असलेल्या मुलांचे पालक ‘सेल्फ अवेअरनेस थ्रू सिनेमा’ या कार्यशाळेत भाग घेऊ शकतील. 

पहिल्या गटचर्चेमध्ये ‘नेविगेटिंग कन्टेन्ट थ्रू द करंट मीडिया एक्‍सप्लोझर’ मूल्यामधील सहनशीलता, प्रेमभावना, सहानुभूती या मूल्यांवर चर्चा केली जाईल. जगभरात चित्रपटांची ओळख करून देणारे तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत. 

 केव्हा : शुक्रवार (ता. ६)  - दु. २ ते ५, शनिवार (ता. ७) व 
रविवार (ता. ८) - स. ९ ते सायं. ६ 
 कुठे : सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी- बाणेर रोड, 
बालेवाडी-बाणेर रोड, लक्ष्मणनगर, बाणेर 
 रजिस्ट्रेशनचे ठिकाण : सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी-बाणेर रोड, लक्ष्मणनगर, बाणेर (दु. २ ते ५)
 प्रवेश शुल्क : २०० रुपये. (एक दिवसासाठी), 
५०० रुपये (तीन दिवसांसाठी)
 संपर्क : ९९३००३०९८९ / ७७१९९८००३३

Web Title: Children's Film Festival