सावधान, सावधान : चीनकडून सायबर हल्ल्याचा धोका; ई-मेल चेक करताना काळजी घ्या 

china cyber attack security tips and tricks marathi
china cyber attack security tips and tricks marathi

भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. हे हत्यार आहे सायबर अटॅकचे. सुत्रांच्या माहितीनुसार चीन भारतावर २१ जुनपासून सायबर अटॅक करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अटॅक ncov2019.gov.in या ई-मेल  मधून होण्याची शक्यता आहे. या ई-मेल चा विषय 'Free Covid 19 Test' असा असू शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनी सायबर अटॅक वाचण्यासाठी या ई-मेल  वरुन आलेली अटॅचमेंट उघडू नका. भारतातील 20 लाख लोकांचे ई-मेल टारगेट वर असल्याची माहिती मिळत आहे. खासगी आणि आर्थिक ई-मेल वर हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. काही दिवासांपूर्वी ऑस्ट्रेलिया वर देखील अशाच प्रकारचा सायबर अटॅक झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर दोन-चार वेबसाईटवर नजर ठेवली जात आहे. माहितीनुसार, चीन हॅकर्स या सायबर हल्ल्याच्या तयारीला लागले आहे.

यापासून कसे वाचावे
जर तुम्हाला अनोळखी संदेश आला, ज्यात एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर असे करू नका. तुम्हाला एखादा मेल आला, ज्यात एखादी अॅटचमेंट असेल तर ती डाऊनलोड करू नका. कोरोना संकट काळात असे सायबर हल्ले वाढल्याचे निदर्शनास आले आहे.. त्यामुळे सायबर सुरक्षेबद्दल आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. याला आपल्या जीवनशैलीचा भाग करुन घ्यायला हवे.

सायबर अटॅकचे धोके 

  • अति महत्वाचे, संवेदनशील, अत्यावश्यक, गोपनीय वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट माहिती चोरी जाण्याची शक्यता 
  • आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता 
  • कॉर्पोरेट सेक्रेटस चोरून ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणे अशा प्रकारच्या गुन्हे वाढू शकतात
  • सर्व्हर, वेब साईट यावरून डेटा नष्ट करू शकतात 
  • ransomware चे मेल्स येतील

प्या गोष्ठी ज्या मुळे आपण स्वतःची काळजी घेऊ शकू:

  • आपण सहसा पर्सनल आणि कॉर्पोरेट ई-मेल अकाउंट हे एकाच मोबाइल मध्ये वापरू नये.
  • बँकिंग अँप्लिकेशन्स मोबाइल मधून वापरायचे टाळावे. कारण जर मोबाइल हॅक किंवा कॉम्प्रोमाईस झाले तर तुमचा मोबाइल मध्ये असेलेले बँकिंग अँप्स सुद्धा धोक्यात येऊ शकते.
  • ई-मेल / सोशल मीडिया साठी Two Way Authentication चा वापर करा. पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
  • कोणत्या हि लिंक वर क्लिक करू नका. 
  • अज्ञात इंटरनेट वापरू नका. 
  • लॅपटॉप आणि मोबाईल साठी फायरवॉल आणि अँटी व्हायरस विकत घेऊन इन्स्टॉल करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com