चीन-अमेरिकेतील व्यापार युद्ध ही जागतिक महायुद्धाची नांदी

Avinash-Dharmadhikari
Avinash-Dharmadhikari

पुणे - चिनी मालावर अमेरिकेने लावलेली व्यापारी बंधने, लादलेला कर आदी घटना हा केवळ व्यापार युद्धाचा भाग नाही. यामुळे परिस्थिती चिघळल्यास त्याचे रूपांतर जागतिक महायुद्धातदेखील होऊ शकते, हे यातून स्पष्ट होते. या आणीबाणीच्या परिस्थितीत भारताला मात्र नेतृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध होत असून, भारत विश्वाचे नेतृत्व करेल, असे मत माजी सनदी अधिकारी आणि चाणक्‍य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांनी रविवारी (ता. ७) येथे व्यक्त केले.

शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टतर्फे चिमणलाल यांच्या स्मरणार्थ ‘उद्यम गौरव’ आणि ‘सेवा गौरव’ पुरस्कारांचे वितरण धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘क्विक हिल टेक्‍नॉलॉजिज’ पुणेचे कैलाश काटकर आणि संजय काटकर आणि गडचिरोली येथील सृष्टी मध उद्योगचे केशव गुर्नुले यांना ‘उद्यमगौरव पुरस्कार’,  तर नागपूरच्या बावनगाव येथील अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलचे डॉ. प्रकाश गांधी, नाशिक येथील योगविद्या धामचे डॉ. विश्वास मंडलिक यांना ‘सेवा गौरव पुरस्कार’ देण्यात आला. 

व्यासपीठावर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मोहन गुजराथी, जयंत गुजराथी, कन्हैयालाल गुजराथी, सुभाषचंद्र देवी आणि डॉ. नलिनी गुजराथी आदी उपस्थित होते. त्या वेळी ‘राष्ट्राराष्ट्रांची व्यापार युद्धे’ या विषयावर धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. 

ते म्हणाले ‘‘जागतिक बाजारपेठ आणि राजकारणाचा आढावा घेतला असता आर्थिक महासत्ता आणि लष्करी महासत्ता असलेल्या राष्ट्रांमधील व्यापार युद्ध ही उद्याच्या महायुद्धाची नांदीच आहे. भारत सर्वांकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहत नाही; तर एक कुटुंब म्हणून पाहतो. कुटुंबप्रमुख या नात्याने भारत कुटुंबातील सर्वच सदस्यांना त्यांचा हिस्सा मिळावा म्हणून आग्रही असतो. हीच पालकत्त्वाची भूमिका भारत आगामी वर्षात निभावताना दिसेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com