पराभूत होऊनही नाना काटे यांना दिलासा तर राहुल कलाटे यांना मात्र मोठा धक्का: Chinchwad By Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By Election

Chinchwad By Election: पराभूत होऊनही नाना काटे यांना दिलासा तर राहुल कलाटे यांना मात्र मोठा धक्का

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे पोटनिवडणुकांचा निकाल काल लागला. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार मतांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. पराभूत होऊनही नाना काटे यांना दिलासा मिळाला आहे. पण राहुल कलाटे यांना मोठा धक्का बसला आहे.

कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला, त्या राहुल कलाटे यांचं या निवडणुकीत डिपॉझिटच जप्त झाले आहे. हजारो मते मिळुनही डिपॉझिट जप्त झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवारांनी सांगितली नाना काटेंच्या पराभवाची कारणं, म्हणाले...| Chinchwad By-Election

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार....

उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणी मध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत. मतदारसंघांमध्ये 2 लाख 87 हजार मतदान झाले. यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते.

मात्र, कलाटे यांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. ही मते न मिळाल्यामुळे कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

Chinchwad Election Result : राष्ट्रवादीचं काय चुकलं? अश्विनी जगताप यांच्या विजयाची ५ कारणे

उमेदवारांना एकूण किती मतं

चिंचवडमध्ये एकूण 28 उमेदवार उभे होते. त्यापैकी भाजपच्या अश्विनी जगताप यांना सर्वाधिक 135603 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99435 मते मिळाली. तर राहुल कलाटे यांना 44112 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक हजाराच्या आत मते मिळाली आहेत. कलाटे यांच्यासह या सर्वच्या सर्व 28 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

टॅग्स :NCP