कलाटेंना उभं करण्यामागे राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी; फडणवीसांनी सांगितली Side Story: Chinchwad By Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By Election

Chinchwad By Election: कलाटेंना उभं करण्यामागे राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी; फडणवीसांनी सांगितली Side Story

चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला, पण भाजपच्या या विजयात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे गेमचेंजर ठरले. (Chinchwad By Election result rahul kalate devendra fadnavis ncp Ajit Pawar )

चिंचवडमधील भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेम चेंजर कलाटेंच्या मागे कोण? पडद्यामागची स्ट्रॅटेजी नेमकी काय होती? याचा खुलासा केला.

अजित पवारांनी सांगितली नाना काटेंच्या पराभवाची कारणं, म्हणाले...| Chinchwad By-Election

काय म्हणाले फडणवीस?

एका वृत्तावाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 'चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा 36 हजार मतांनी विजय झाला. चिंचवडच्या जनतेने लक्ष्मण जगताप यांना या विजयातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला, असा भ्रम काही जण पसरवत आहेत, पण हे सत्य नाही.

2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं, पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले.

Chinchwad Election Result : राष्ट्रवादीचं काय चुकलं? अश्विनी जगताप यांच्या विजयाची ५ कारणे

त्यावेळी हा प्रयोग का झाला होता? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं आहेत ही सरळ भाजपकडे जातील, म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होतं', असं फडणवीस म्हणाले.

'यावेळीही राहुल कलाटे उभे राहिले, त्यामागेही हेच डिझाईन होतं. ते जर उभे राहिले नाहीत तर हिंदुत्ववादी मतं शिवसेनेकडे जातात ती सगळी मतं भाजपकडे जातील, म्हणून त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांनी मतं घेतली. ती सगळी मतं महाविकासआघाडीला गेली नसती.

कसब्यातल्या दारुण पराभवानंतरही चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास, ...पुन्हा कमळ फुलवू! Kasba By Election Result

ते उभे राहिले नसते तर 60-65 टक्के मतं भाजपला मिळाली असती. ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटजी होती, त्यातूनच त्यांनी कलाटेंना उभं केलं', असा दावा फडणवीस यांनी केला आहे.