काटे 'लढले' पण कलाटे 'नडले!' जर का...| Chinchwad Bypoll Result 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Bypoll Result 2023

Chinchwad Bypoll Result 2023 : काटे 'लढले' पण कलाटे 'नडले!' जर का...

Chinchwad Bypoll Result 2023 : कसबा - चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची सगळ्या राज्यभरात चर्चा होती. त्यात कोण विजयी होणार याची अनेकांना कमालीची उत्सुकता होती. कसबा पोटनिवडणूकीतील निकाल आता समोर आला असून त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे निवडून आले आहे. तर रासने यांचा पराभव झाला आहे.

चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल अजुन समोर येणं बाकी आहे. तिथे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत आहे. आतापर्यत या वीस फेऱ्यांचा निकाल समोर आला असून त्यामध्ये जगताप या आघाडीवर असून त्यांनी अकरा हजार मतांचे लीड घेतले आहे. दुसरीकडे काटे हे पिछाडीवर आहेत. अद्याप सतरा फेऱ्या बाकी असून निकालात काही बदल होणार का याची उत्सुकता मतदारांना, कार्यकर्त्यांना आहे.

Also Read : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यासगळ्यात सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ती म्हणजे महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची. कलाटे यांनी नाही म्हटलं तरी आतापर्यत वीस हजारांहून अधिक मतं घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीनं काटे यांना विजयाचा जो आत्मविश्वास होता तो आता कमी होताना दिसतो आहे. निवडणूकीपूर्वी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कलाटे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

जगताप यांना प्रचंड मताधिक्य मिळत असले तरी त्यांना टक्कर देण्यात नाना काटे यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांचे मताधिक्य कमी होण्यात कलाटे यांची भूमिका महत्वाची ठरताना दिसत आहे. यासगळ्यावर सोशल मीडियावर ज्या वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्या भन्नाट आहेत. कलाटे यांनी काटे यांची डोकेदुखी वाढवली. कलाटे यांचे स्वप्न भंग होण्यात कलाटेंचा पुढाकार अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

अद्याप काही फेऱ्या बाकी आहेत. त्यात काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र कलाटे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूकीमध्ये बाजी मारली आहे त्यावरुन ते पुढील फेऱ्यांमध्ये देखील काटे यांची डोकेदुखी आणखी वाढवतील असे चित्र आहे.

टॅग्स :BjpPune Newselection pune