
Chinchwad Bypolls Results : विजयासमीप असलेल्या अश्विनी जगताप म्हणाल्या राहुल कलाटेंमुळे...
पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कसबा मतदार संघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय झाला. तर तिकडे भाजपच्या अश्विनी जगताप विजयाच्या समीप आहेत. जगताप ३२ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अश्विनी जगताप म्हणाल्या की, अजुनही आघाडी मिळण्याची शक्यता आहे. आमच्या बालेकिल्ल्याची काउंटीग सुरू आहे. त्यामुळे आघाडी तीस हजारच्या पुढे जाईल. निवडणूक महत्त्वाची होती. साहेब गेले असले तरी गड राखायचा होता. जनतेने गड राखला आहे.
'अमर रहे अमर रहे लक्ष्मण जगताप अमर रहे', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि जनतेला समर्पित करते. तसेच पक्ष नेतृत्वाने सूचना केल्यानंतर आपण अधिवेशनाला जाणार आहोत. आपण सर्वसामान्यांची आमदार म्हणून काम करणार असल्याचंही जगताप यांनी सांगितलं. तसेच राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे फायदाच झाल्याचं त्या म्हणाल्या.
चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे ८९ हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर असून राहुल कलाटे ४० हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.