चिंचवड : प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी पळवली मोटार 

सोमवार, 14 जानेवारी 2019

पिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली.

पिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली.

विशाल नागनाथ रणदिवे (वय २०, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार चोरटय़ांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १३) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी रणदिवे हे मारुती सुझुकी (एमएच-१२-एनबी-०८१८) या मोटारीतून चार प्रवासी घेऊन संभाजी नगर-चिंचवडहून कात्रजच्या दिशेने चालले होते. ते कात्रज घाट येथे आले असता प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी रणदिवे यांची मोटार तसेच त्यांच्याकडील १५ हजाराचा मोबाईल फोन व १५० रूपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख १५ हजार १५० रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.