‘चायनीज’ची धोकादायक पद्धतीने विक्री

अवधूत कुलकर्णी
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिंपरी - शहरातील चायनीज विक्रेत्यांपैकी बहुतांश धोकादायक पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असूनही प्रशासनाचे संबंधितांवर कारवाई करताना दुर्लक्ष होताना दिसते. शहरात चायनीज पदार्थ विक्रेत्यांची संख्या सुमारे सातशे आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारल्यानंतर आढळून आलेली स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात पुढीलप्रमाणे - 

स्थळ - १ 
भेळ चौक, प्राधिकरण : बिजलीनगरकडे येणाऱ्या मार्गावर पदपथावरच या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी साडेपाचनंतर टेबल-खुर्च्या टाकून बिनधास्तपणे हे विक्रेते व्यवसाय करीत होते.  

स्थळ - २
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी : मुंबई-पुणे महामार्गालगतच एका व्यावसायिकाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. केवळ एका हिरव्या जाळीचा एक छोटासा आडोसा आहे. त्याच्या आत टेबल खुर्च्या मांडून बिनदिक्कत व्यवसाय सुरू होता. या विक्रेत्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्याबाबत तो अनभिज्ञ होता. या विक्रेत्याकडे तुमची कोणती संघटना आहे का, अशी विचारणा केली असता आम्हा विक्रेत्यांची कोणतीही संघटना नसल्याचे त्याने सांगितले. संत तुकाराम महाराज उद्यान, प्राधिकरण : उद्यानाच्या सीमा भिंतीलगतही अशाच प्रकारे पदपथावरच विक्री सुरू होती. 

स्थळ - ३ 
डीलक्‍स चौक, पिंपरी - पदपथावर खाद्यपदार्थांची बिनदिक्कतपणे विक्री सुरू होती. या पदार्थांच्या दर्जाबाबत ग्राहकही फारसे जागरूक नसल्याचे दिसते.

माझ्या मैत्रिणीमुळे मला चायनीज खाण्याची आवड निर्माण झाली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी व्हेज मंचुरियन खाते. त्यातून नॉनव्हेज खाल्ल्याचा आनंद मिळतो. 
- काजल प्रजापती, ग्राहक, पिंपरी

शहरात कोठे विनापरवाना चायनीज विक्रेते आढळल्यास कारवाई करू. 
- संजय नारगुडे, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

चायनीज पदार्थांत वापरल्या जाणाऱ्या सॉसमध्ये प्रामुख्याने मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा पदार्थ असतो. त्यामुळे पदार्थाची लज्जत वाढण्यास मदत होते. तसेच लठ्ठपणाही वाढतो. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरासाठी आवश्‍यक पौष्टिक घटक शोषून घेण्याची शरीराची क्षमता ५० टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. या पदार्थांमध्ये मैदा, मीठ, तेलाचा वापरही जास्त प्रमाणात होतो. आहारात मैद्याचे प्रमाण जास्त झाल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो.
- सायली पितळे, आहारतज्ज्ञ

Web Title: chinese sailing dangerous