Chitra Wagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी गाव पातळीवर करा; चित्रा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh Implement schemes announced Prime Minister Narendra Modi for women village

Chitra Wagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी गाव पातळीवर करा; चित्रा वाघ

मंचर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना कार्यरत केलेल्या आहेत. या योजना सामान्य महिलापर्यंत पोहचविण्याचे काम गाव पातळीवरील भाजप महिला कार्यकर्त्यांनी करावे.” असे भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे गुरुवारी (ता.९) भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मंचरच्या वतीने संघटन बैठक झाली. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे, भारतीय सीमा सुरक्षा दलातील अश्विनी लबडे - कापडी, अभिनेत्री शिवानी कथले, पीएचडी संपादन केलेले प्रसन्ना सैद्, कवयित्री भारती वाघमारे, विद्यार्थिनी कीर्ती घाटगे या कर्तुत्ववान महिलाना (स्व) सुषमा स्वराज पुरस्कार चित्रा वाघ याच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्षा स्नेहल दगडे, इलाक्षी महाले, सरचिटणीस श्रेया राहीलकर उपस्थित होत्या. वाघ म्हणाल्या, “महिलावर सोपविलेली जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडतात जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी उज्वल ठरली आहे. महिलांना कुटुंबात, गावात व सर्वच सरकारी व निमसरकारी कार्यालयात सन्मानपूर्वक वागणूक मिळणे गरजेचे आहे.”

भाजपा तालुकाअध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे व संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक छाया थोरात व मंचरशहर महिला भाजप अध्यक्ष जागृती महाजन यांनी सूत्रसंचालनकेले. स्वप्ना खामकर, ज्योती काळे, सोनाली काळे, पल्लवी थोरात, माधुरी पंदारे यांनी व्यवस्था पहिली. रूपाली घोलप यांनी आभार मानले.