‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

साधना कला मंच (पुणे) यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनात वेगवेगळ्या चित्रशैलीतील चित्रे बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात रेझिनसारख्या वेगळ्या माध्यमात काम करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते, इंक माध्यम वापरून व्यक्तिचित्र जिवंत करणाऱ्या अल्पना लेले, विवेक देशमुख, संतोष महाडीक, गणपतीची अप्रतिम चित्रे काढणाऱ्या कविता जोशी, गोव्याचे राज्य पुरस्कार विजेते दामोदर मडगावकर, पेपर कटिंगमधून आपल्या चित्राची मांडणी करणाऱ्या जानकी लेले आणि इतर अनेक चित्रकारांची अप्रतिम चित्रे पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन १६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० पर्यंत खुले आहे.

मी गेली १०-१२ वर्षे विविध माध्यमातून पेंटिंग करते. छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज माझ्यासाठी एक पॅशन बनला आहे. अबस्ट्रॅक्‍ट पेंटिंग्ज ही माझी खास आवड. यात समुद्राशी संबंधित क्षेत्रातील असल्याने या प्रदर्शनासाठी मी हीच थीम निवडली आहे. खूप छान अनुभव या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे.
- डॉ. स्वप्नजा मोहिते, चित्रकार

Web Title: Chitrasadhana 2018 Exhibition Drawing Art