
दापोडीतील विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राईस्ट चर्चमध्ये फुग्यांची सजावट लक्षवेधी होती. येशू जन्माचे स्वागत लख्ख मेणबत्यांनी केले. सर्व चर्चमध्ये रात्री दहापासूनच प्रार्थना सुरु होत्या. सकाळीही ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले होते. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील तरुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. केक व गोड पदार्थांचा आनंद सर्व बांधवांनी घेतला.
पिंपरी : ख्रिस्ती बांधवाचा आनंदाचा असा नाताळ सण (ता.25) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शांतीचा संदेश देत ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना भेटवस्तू व शुभेच्छा दिल्या. मध्यरात्रीपासूनच येशूच्या जन्मदिनानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हजेरी लावली.
नाताळनिमित्त केलेली आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दापोडीतील होली क्रॉस, विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राईस्ट चर्च, नवी सांगवीतील होली ट्रिनिटी चर्च, चिंचवडमधील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च, निगडीतील इनफंट जिझस चर्च, आकुर्डीतील सेंट जोसेफ चर्च, पिंपळे गुरवमधील सेंट थॉमस चर्च, पिंपरीतील द युनायटेड ख्राईस्ट चर्च, द अवर लेडी ऑफ दी कन्सोलर ऍप्लिक्टेड चर्च, सेंट मारथोमा, फेथ सेंटर चर्च, तळवडेतील इनफंट जिजस चर्च, काळेवाडीतील सेंट अल्फान्सो चर्च, निगडी व पिंपळे गुरवमधील सेंट ऍन्थॉनी चर्च, काळेवाडी विजयनगरमधील केडीसी चर्च, सेंट बेथनी चर्च, आकुर्डीतील द ट्रिनिटी चर्चसह विविध चर्चमध्ये बायबलचे वाचन करण्यात आले.
मध्यरात्रीपासून कॅरोल सिंगिग ठिकठिकाणी सुरु होते. येशू जन्माचे जिवंत देखावे साकारण्यात आले होते. चिमुकल्यांनीही दिवसभर नाताळ उत्सवाचा आनंद लुटला. 'मेरी ख्रिसमस', 'हॅपी ख्रिसमस अशा शुभेच्छा एकमेकांना सर्वांनी दिल्या.
दापोडीतील विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राईस्ट चर्चमध्ये फुग्यांची सजावट लक्षवेधी होती. येशू जन्माचे स्वागत लख्ख मेणबत्यांनी केले. सर्व चर्चमध्ये रात्री दहापासूनच प्रार्थना सुरु होत्या. सकाळीही ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले होते. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील तरुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. केक व गोड पदार्थांचा आनंद सर्व बांधवांनी घेतला. विविध चर्चमध्ये 'पवित्र मिस्सा बलिदान' ही प्रार्थना सादर करण्यात आली. चर्चमध्ये गोरगरिबांना विविध वस्तूंचेही वाटप करण्यात आले. चिमुकल्यांनी सांताक्लॉजचा पेहराव परिधान केला होता. सर्वांनी लाल रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. सर्व ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये सेल्फिचा आनंद लुटला.