Church
Church

Merry Christmas : चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करताय? अशी घ्या काळजी!

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत नाताळनिमित्त चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शुभेच्छा देणे, केक, कुकीज, फराळाचे पदार्थ देऊन तोंड गोड केले जाते. तर घरोघरी तसेच चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखाव्याची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठीही ख्रिस्ती नागरिकांसह सर्व धर्मीय नागरिकही गर्दी करतात. परंतु, यंदा अन्य सणांप्रमाणेच नाताळ सणावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाठीभेटी टाळण्याबरोबरच चर्चमधील प्रार्थनेवरही यंदा मर्यादा आल्या आहेत. चर्चमध्ये केवळ 50 लोकांनाच प्रवेश असणार आहे. 

'सर्व नियमांचे पालन करत नाताळ साजरा केला जाणार असून शहरातील सर्व चर्चमध्ये याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. तर, सगळ्यांना प्रार्थनांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी प्रार्थनांची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच जे भाविक घरी असतील त्यांच्यासाठी ऑनलाइन प्रार्थनांची सुविधा ठेवण्यात आली आहे, '' असे "सेंट पॅट्रिक कॅथेड्रल'चे बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाविकांची गर्दी चाळण्यासठी शहरातील विविध चर्चमध्ये टोकन आणि ऑनलाइन बुकिंग सुविधा ठेवण्यात आली. त्यामुळे मर्यादित संख्येत भाविकांना प्रवेश देणे सोयीचे आणि सोपे झाले आहे.

'नागरिकांना चर्चमध्ये येण्यावर बंधने नाहीत. फक्त गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी केवळ 50 लोकांना चर्चमध्ये प्रवेश देत आहोत. यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अधिक सोपे होईल. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असून येणारे नवे वर्ष सुखाचा आणि आनंदाचा असेल अशी प्रार्थना करू.''
- रेव्ह. विजय म्हंकाळे, इम्मानुएल चर्च

'दरवर्षी चर्चमध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करतो. घरात लहान बाळ असल्यामुळे यंदा घरीच नाताळ साजरा करणार आहे. त्यामुळे या वर्षी मित्र मैत्रिणींना भेटून प्रत्यक्षात शुभेच्छा देता येणार नाही याची खंत आहे. परंतु घरी राहून ऑनलाइन प्रार्थनेत सहभाग घेऊ.''
- नताशा नाईक

अशी घेतली जाणार काळजी
- चर्चमध्ये केवळ 50 लोकांची परवानगी
- प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना मास्क घालणे आवश्‍यक
- प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग केली जाणार
- चर्चमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्‍यक
- दहा वर्षांचा खाली व 65 वर्षा पुढील नागरिकांना प्रवेश नाही
- सगळ्यांना प्रार्थनेत सहभाग घेता यावा यासाठी ऑनलाइन प्रार्थना

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com