ख्रिसमससाठी प्लम अन्‌ वाइन केक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - ‘रमबॉल’... ‘स्विस चॉकलेट’... ‘रेम्बो फिस्ट’... ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’... ‘ख्रिसमस सान्ता’ अशा अनेक प्रकारांमधील केक खास ख्रिसमससाठी ‘ट्रीट’ ठरत आहेत. त्यातही वेगळ्या प्रकारच्या ‘प्लम केक’ व ‘वाइन केक’ला खवय्यांकडून पसंती मिळत आहे. या केकमध्येही ड्रायफ्रूट, रिच प्लम आणि चॉकलेट यांसारखे फ्लेवर्स ‘केक मार्केट’मध्ये उपलब्ध आहेत. 

ख्रिसमसचे औचित्य साधून बेकरींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक तयार होत आहेत. त्यामध्ये ‘ख्रिसमस लॉग’, ‘डेट अँड वोल्नट’, ‘फ्रूट केक’, ‘चॉकलेट’, ‘कॅन्डल केक’ अशा प्रकारांमधील केकही बनविले आहेत. ५० ग्रॅमपासून ते चार किलोपर्यंतचे हे केक बेकरींमधून खरेदी करण्याबरोबरच ते तयार करून दिले जात आहेत. डिझाइनर केक तुम्ही तयार करून घेऊ शकता, त्यासाठी एक दिवस आधी नोंदणी करावी लागते. खास ख्रिसमसनिमित्त बनविण्यात येणाऱ्या कप केकपासून डिझायनर केकपर्यंतचे अनेक पर्याय बाजारपेठेत असल्याचे दिसून येते. साधारणत: २५ रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंतचे हे केक बेकरींमध्ये उपलब्ध आहेत.

ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या पार्ट्यांसाठी ‘कप केक’ हा चांगला पर्याय ठरत आहे. यामध्ये व्हॅनिला, चॉकलेट, चोको-चिप्स, रेड वेल्वेट, चोको लावा, वॉल्नट ब्राउनी, अल्मण्ड वीथ कोकनट बिस्किट्‌स आणि आणि स्लाइस केक असे पर्याय आहेत. 

केकविक्रेते हसन यावेरी म्हणाले, ‘‘ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे आणि खास ख्रिसमससाठी बनविलेले प्लम केक हे २० रुपयांपासून उपलब्ध आहेत; तसेच अंड्याचा वापर करून आणि अंडे न वापरता तयार केलेले केकही ग्राहकांच्या मागणीनुसार बनविले जातात. या केकची आकर्षक पद्धतीने सजावट करून; तसेच ग्राहकांच्या सोईसाठी पॅकिंग करून दिले जाते.’’

Web Title: christmas plum & cake