जिंगल बेल जिंगल बेल...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

‘जिंगल बेल जिंगल बेल’ असे गुणगुणत, ख्रिसमस कॅरलसिंगिंग, लहानग्यांच्या हातात चॉकलेट, छोट्या-छोट्या ‘गिफ्ट’, चर्चभोवतीचे स्टार, बेल्स आणि आकर्षक विद्युतरोषणाई... एकमेकांना शुभेच्छा आणि येशूकडे मनोभावे होणारी प्रार्थना, ख्रिसमस ट्री आणि गव्हाण सजावटीसोबत ‘सेल्फी’ रंगलेली तरुणाई... अशा उत्साही वातावरणात बुधवारी पुण्यात नाताळ सण साजरा करण्यात आला.

पुणे - ‘जिंगल बेल जिंगल बेल’ असे गुणगुणत, ख्रिसमस कॅरलसिंगिंग, लहानग्यांच्या हातात चॉकलेट, छोट्या-छोट्या ‘गिफ्ट’, चर्चभोवतीचे स्टार, बेल्स आणि आकर्षक विद्युतरोषणाई... एकमेकांना शुभेच्छा आणि येशूकडे मनोभावे होणारी प्रार्थना, ख्रिसमस ट्री आणि गव्हाण सजावटीसोबत ‘सेल्फी’ रंगलेली तरुणाई... अशा उत्साही वातावरणात बुधवारी पुण्यात नाताळ सण साजरा करण्यात आला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाताळ हा ख्रिस्तीबांधवांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. या उत्सवात सर्वधर्मीयांचा पुढाकार वाढत आहे. शहरातील विविध भागांमध्ये हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रात्री बारानंतर येशूच्या जन्मोत्सवात सणाची सुरुवात झाली. त्या वेळी केक कापून येशूच्या जन्माचा सर्वत्र जल्लोष करण्यात आला. त्यानंतर सकाळपासून विविध चर्चमध्ये सामूहिक भक्तिद्वारे सणाला प्रारंभ झाला. त्याचसोबत सेंट मेरी चर्च-कॅम्प, सेंट पॅट्रिक्‍स, ख्राईस्ट चर्च रास्तापेठ, चर्च ऑफ होली नेम, सी. एन. आय. पंच हौद, सेंट मॅथ्यू चर्च कॅम्प, सेंट मेरी चर्च- खडकी, देशपांडे चर्च, विनियार्ड चर्चमध्ये धर्मगुरूंनी संदेश देऊन, लोकांना शुभेच्छा दिल्या.

विद्युतरोषणाईने सजलेल्या लष्कर परिसरात तरुणाईंनी खास ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आल्याचे दिसून आले. काहींनी हातात रंगीबेरंगी फुले, तर काहींनी सांताक्‍लॉजची लाल टोपी घालून ‘सेल्फी’चा आनंद घेतला. तर प्लम केक, चॉकलेट केक, डोनट आणि कुकीज्‌चा आनंद घेतला. तर, चर्चमध्ये आलेल्या चिमुकल्यांनी सांताक्‍लॉजसोबत नृत्य केले.

‘नाताळची तयारी आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू केली होती. इतर धर्मांच्या लोकांना देखील नाताळ सणाची माहिती मिळावी म्हणून चर्चमध्ये दोन तासांचे नाटक सादर करण्यात आले होते. यामध्ये येशूच्या जन्माची आणि नाताळची माहिती लोकांना देण्यात आली.’’
- प्रीती नोयल, सेंट मेरी चर्चच्या सदस्य

‘‘आम्ही प्रत्येक वर्षी चर्चमध्ये येतो. ख्रिसमससाठी लोकांच्या मनोरंजनासाठी नाटक, नृत्य आणि लहान मुलांसाठी खेळ घेण्यात येतात. चर्चमध्ये सर्व धर्मांचे बांधव येतात आणि निरनिराळ्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करीत आम्ही आनंद घेतो.   
- शेनोली कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Christmas Utsav Celebration