शिवछत्रपती संकुलात ‘सीआयएससीई’ क्रीडा स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
02.31 AM

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या लॉन टेनिस मैदानावर झाले.

या समारंभाला सीआयएससीईचे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युअल, वित्त उपसचिव अरीजीत बसू, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक गौरव दीक्षित, महाराष्ट्र गोवा सीआयएससी गेम्सच्या सचिव पेरीन बागली; तसेच पुणे शहरातील आयसीएसई शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.

उद्‌घाटन सोहळा उत्साहात; देशभरातून २३ संघांच्या २४० खेळाडूंचा सहभाग 
पुणे - भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या लॉन टेनिस मैदानावर झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या समारंभाला सीआयएससीईचे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युअल, वित्त उपसचिव अरीजीत बसू, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक गौरव दीक्षित, महाराष्ट्र गोवा सीआयएससी गेम्सच्या सचिव पेरीन बागली; तसेच पुणे शहरातील आयसीएसई शाळांचे प्राचार्य उपस्थित होते. देशभरातून तेवीस संघांतील २४० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धा ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहेत. महाराष्ट्र सीआयएसई आयोजित या स्पर्धेचे नियोजन बिशप स्कूल कल्याणीनगर व उंड्री यांनी केले 
आहे. या वेळी विविध राज्यांतील सहभागी खेळाडूंनी आपापल्या संघांसह मैदानावर शिस्तबद्ध ध्वजसंचलन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CISCE Sports Competition in Shivchatrapati Sankul