'ना नफा ना तोटा' तत्वावर नागरिकांसाठी शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मांजरी - महादेवनगर येथील माजी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी महेश नलावडे यांनी येथील पाण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ना नफा ना तोटा या तत्वावर फिल्टर पाण्याचे जार घरोघर देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत यांनी केले.

या प्रसंगी बोलताना, पाणी, कचरा व आरोग्य या समस्यांचा भार मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत आता सक्षमपणे पेलू शकणार नाही. त्यासाठी पालिका प्रवेश हाच एकमेव चांगला पर्याय असून, येथील महिलांनीच त्यासाठी लढा दिला पाहिजे असे सीमा सावंत यांनी म्हटले आहे. 

महिला काँग्रेसच्या पूर्व हवेलीच्या अध्यक्षा संजीवनी कोंडे, मंदाकिनी नलावडे, महेश नलावडे, पितांबर धिवार, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद, गिरीश खरात आदी यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना महेश नलावडे म्हणाले,"महादेवनगर-मांजरी भागात शुध्द पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. अनेक नागरिक दररोज पन्नास-साठ रुपये घालवून पाणी विकत घेत आहेत. त्यांना अल्प दरात घरपोच शुद्ध पाणी मिळावे, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे बाहेर चाळीस रुपयाला मिळणारा सिलबंद जार केवळ पंधरा रुपयात घरपोच उपलब्ध करून दिला जाणार आहे.''

Web Title: Citizen will get filter water on 'No profit no loss' basis