खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप

किरकटवाडी: तब्बल दीड वर्षापासून सुरु असलेल्या खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने खडकवासला गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी संबंधित ठेकेदारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करत जिल्हा परिषदेकडे बिल थांबविण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपअभियंता बाबुराव पवार, कनिष्ठ अभियंता शालिनी कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे यांनी खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून योग्य काम करण्याबाबत ठेकेदारास सूचना केल्या आहेत.

फेब्रुवारी 2020 पासून खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर दुरुस्तीसाठी 25 लाख व 19 लाख अशा दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. दोन्हीही ठेकेदारांचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत असून त्यातील एका ठेकेदाराने अत्यंत निकृष्टपणे दुरुस्ती केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खडकवासला गावातील नागरिक व ग्रामपंचायतीनेही त्याबाबत जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केलेली आहे.

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप
पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

नागरिकांच्या तक्रारींवरून जिल्हा परिषदेचे उपअभियंता बाबुराव पवार, कनिष्ठ अभियंता शालिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून पंधरा दिवसांच्या आत ठेकेदाराला उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी सरपंच सौरभ मते, विजय कोल्हे, राहुल मते, दिगंबर कोल्हे, अनिकेत मते, मंदार मते, अनिल मते, राज सपकाळ, पोलीस पाटील ऋषिकेश मते आदी नागरिक उपस्थित होते.

तळीरामांचा अड्डा व दुर्गंधी.... प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडल्याने व काही भागाचा वापर नसल्याने या ठिकाणी तळीरामांचा अड्डा तयार झाला आहे. मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, कचऱ्याचे ढीग यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर अत्यंत गलिच्छ बनला आहे.

"गेल्या वर्षभरापासून दवाखान्याची दुरुस्ती सुरू असल्याने प्रसुती, सर्पदंश व इतर उपचार घेण्यासाठी नागरिकांना खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आता तरी लवकर काम मार्गी लागावे." विजय कोल्हे,ग्रा.पं. सदस्य, खडकवासला.

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप
भारतीय व्हेरियंटवर लस, कोरोनावरील उपचार प्रभावी; WHOचा निर्वाळा

"प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याबाबत वारंवार जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. तशी लेखी तक्रारही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे करण्यात आलेली आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून घेण्यात यावे व नागरिकांची गैरसोय टाळावी.तसेच कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे." सौरभ मते, सरपंच, खडकवासला.

"सदर कामासाठी जिल्हा परिषदेत वाद घालून निधी मंजूर करुन घेतला होता.काम रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.गरज पडल्यास अधिक निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल." जयश्री पोकळे, जिल्हा परिषद सदस्या.

"एका ठेकेदाराने दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे.उर्वरित काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आरोग्य कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे." बाबुराव पवार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com