सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

रमेश मोरे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असुन परिसरातील मुख्य चौकातुन, रस्त्यावर कुत्र्याच्या झुंडींचा मोकाट वावर वाढल्याने नागरिकांना कुत्र्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. येथील माहेश्वरी चौक, मुळानदी किनारा रस्ता, शिंदेनगर, शितोळेनगर प्रमुख रस्ता, वसंतदा पुतळा बसस्थानक, भाजीमंडई परिसर, उद्यान परिसर, नदीघाट परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्री अचानक नागरिकांच्या अंगावर धावुन जातात.

सकाळी व रात्री रस्त्यावर यांचा वावर वाढल्याने रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. जेष्ठ नागरिक, शाळकरी मुले, यांच्या मागे कुत्री भुंकत मागे लागल्याच्या घटना परिसरात घडत आहे. भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडई परिसरात आलेल्या महिला, लहान मुले यांच्या मागे कुत्री धावल्याने अपघात घडल्याच्या किरकोळ घटनाही या परिसरात घडल्या आहेत. सकाळी शाळेत जाणा-या शाळकरी मुलांना कुत्र्यांच्या दहशतीखाली शाळा गाठावी लागत आहे.

प्रमुख रस्ते, चौकामधुन कुत्र्यांचा मोकाट वावर असल्याने अनेकदा कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. येथील मुळानदी किनारा रस्त्यावर कुत्री दुचाकींच्या मागे लागल्याने दुचाकीस्वार पडल्याच्या घटनाही यापुर्वी येथे घडल्या आहेत. येथील वसंतदादा पुतळा बसथांब्यावर विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांना कुत्र्यांच्या दहशतीखाली बस पकडावी लागत लागत आहे. कुत्री धावुन अंगावर येत असल्याने या परिसरात कुत्र्यांच्या भितीखाली नागरीक वावरतात. मोकाट भटक्या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

गेली तीन चार महिन्यांपासुन मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे.कुत्री चावल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. कुत्री पकडायला गाडी आल्यावर कुत्री पळुन जातात.
- दत्तात्रय भोसले, नागरीक 

परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधित विभागाला सुचना दिल्या आहेत.
- संतोष कांबळे, नगरसेवक जुनी सांगवी-
 
Web Title: citizens are panic due to stray dogs in sangavi