...म्हणून कोथरूडकर उतरणार रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020


नाल्यातील पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त, पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध 

कोथरूड (पुणे) : गेली अनेक वर्षे निवेदन देऊन आणि तक्रारी करून देखील कोथरूडमधील माधवबागेच्या मागून वाहणाऱ्या आणि राहुल पार्कच्या मागून येणाऱ्या नाल्याचा प्रश्न सोडवण्यास महानगरपालिका असमर्थ ठरली आहे. आम्ही प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आहोत. मात्र, तरीदेखील दुर्गंधीचा त्रास इथे वर्षानुवर्षे आम्हाला सहन करावा लागत असल्याची तक्रार शंकर गुंजाळ यांच्यासह परिसरातील इतर रहिवासी करत होते. 
याबाबत बोलताना गुंजाळ पुढे म्हणाले,

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

"महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आणि या त्रासाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भातील निवेदन विभागीय आयुक्त, स्थानिक लोकप्रतिनिधींना दिले आहे. अनंतकृपा सोसायटी, मधुकमल सोसायटी तसेच आजूबाजूच्या 65 कुटुंबांतील सदस्यांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे.' 
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धरणे वा आंदोलन करू नये असे पोलिसांनी सांगितले. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

जनतेवर आंदोलन करण्याची वेळ का यावी असा प्रश्न उपस्थित करत सुधीर तळवळकर म्हणाले की, नाल्यातील मैलायुक्त पाणी ओढ्यातून नदीमध्ये मिसळत आहे. जायका प्रकल्प करणे तर दूरच यांना साधे नाल्यातील मैलापाणी पण रोखणे जमत नाही. महानगरपालिकेच्या या ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are suffering from the stench of Nala water