दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटनांनी बारामतीकर त्रस्त

मिलिंद संगई
शुक्रवार, 11 मे 2018

बारामती (पुणे) : सातत्याने होणाऱ्या दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटनांनी बारामतीकर त्रस्त आहेत. नियमितपणे या दोन चोऱ्यांचे प्रकार बारामती शहर व तालुक्याच्या हद्दीत घडत असूनही त्याच्या तपासाबाबत पोलिसांना यश मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. 

बारामती (पुणे) : सातत्याने होणाऱ्या दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटनांनी बारामतीकर त्रस्त आहेत. नियमितपणे या दोन चोऱ्यांचे प्रकार बारामती शहर व तालुक्याच्या हद्दीत घडत असूनही त्याच्या तपासाबाबत पोलिसांना यश मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. 

बारामती व तालुक्याच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून नियमितपणे दुचाकी चोरुन नेली जाते. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींपासून ते घराखालील पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीही चोरुन नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. या शिवाय दर गुरुवारी बारामतीच्या भाजी मार्केटमधून मोबाईल चोरीच्या घटनाही सातत्याने घडत असताना ते चोरटेही सापडत नसल्याने लोक हैराण आहेत. काल एका तासात चार जणांचे 40 हजारांचे चार मोबाईल चोरीला गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. 

दुचाकी आणि मोबाईल चोरीला गेल्यावर काही हजारात नागरिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. बारामतीत तर चोरीच्या भीतीने रस्त्यावर दुचाकी लावताना लोक विचार करत आहेत. 

शहर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस दलांची शोधपथके कार्यरत असूनही दुचाकी व मोबाईल चोरीचा छडा लागत का नाही या बाबत नागरिकात चर्चा आहे. वरिष्ठ अधिकारी सापळा लावल्याचे व तपास सुरु असल्याचे सांगतात खरे, प्रत्यक्षात चोरीला गेलेल्या शंभराहून अधिक दुचाकी गेल्या कोठे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.

Web Title: citizens of baramati frustrated for mobile and two wheeler robbery