नागरिकांच्या अकराशे हरकती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - नव्या प्रभागांमध्ये नैसर्गिक सीमा तोडल्या, चुकीच्या पद्धतीचे आरक्षण, प्रभागांना मनाला वाटेल तशी नावे दिली आहेत...अशा स्वरूपाच्या तब्बल अकराशे हरकती नागरिकांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर मांडल्या. या हरकतींचा विचार करून त्यानुसार बदल करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. दरम्यान, हरकती आणि सूचना निवडणूक आयोगाकडे पाठविल्या जातील, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पुणे - नव्या प्रभागांमध्ये नैसर्गिक सीमा तोडल्या, चुकीच्या पद्धतीचे आरक्षण, प्रभागांना मनाला वाटेल तशी नावे दिली आहेत...अशा स्वरूपाच्या तब्बल अकराशे हरकती नागरिकांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर मांडल्या. या हरकतींचा विचार करून त्यानुसार बदल करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. दरम्यान, हरकती आणि सूचना निवडणूक आयोगाकडे पाठविल्या जातील, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महापालिकेने निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचना आणि आरक्षणासंदर्भातील हरकतींवर बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता सुनावणीला सुरवात झाली. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी उपस्थित होते. प्रभागनिहाय हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्या. नागरिकांना प्रभागानुसार ठराविक वेळ देण्यात आली होती. प्रभागांच्या नकाशांसाठी स्वतंत्र स्क्रीनची व्यवस्था केली होती.

नव्या प्रभागरचनेबाबत सर्वाधिक तक्रारी हद्दीच्या असून, जनगणना गट आणि नैसर्गिक सीमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, नदी आणि कालवे ओलांडून प्रभाग केले आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही प्रभागांमध्ये समाजघटक नसतानाही त्यासाठी आरक्षण टाकल्याचे सांगत, आरक्षण चुकीचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ""नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून घेतल्या आहेत. त्यावर आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांचे मत घेऊन येत्या 19 नोव्हेंबरपर्यंत हरकतींचा एकत्रित प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर येत्या 25 नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना जाहीर होईल.''

शहिदांची नावे द्या
प्रभागांच्या हद्दी आणि आरक्षणापाठोपाठ प्रभागांच्या नावांवर नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. प्रभागांच्या नावांवरून वाद होण्याची शक्‍यता असल्याने प्रभागांना शहिदांची नावे देण्याची सूचना या वेळी करण्यात आली. एकाच पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागांत एकच चिन्ह द्यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

प्रभाग-क्षेत्रीय कार्यालये ताळमेळ नाही
प्रभागांची हद्द आणि क्षेत्रीय कार्यालये यांचा ताळमेळ नसल्याची बाब नागरिकांनी या निमित्ताने निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे सांगत वडगाव शेरीतील (प्रभाग क्र. 3) विमाननगर-सोमनाथनगरला टिंगरेनगरचा काही भाग जोडल्याचे उदाहरण देण्यात आले. या भागातील नागरिकांना लांबच्या अंतरावरील क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार असल्याचे एका हरकतीत नमूद केले आहे.

महापालिकेकडे आलेल्या हरकती व सूचना 1 हजार 102
हरकती व सूचनांचे प्रकार 133
प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी झालेले नागरिक 356

Web Title: Citizens of eleven objections